सीमा सुरक्षा दल (BSF) ने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी 1121 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. 24 ऑगस्ट 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करा. निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, संगणक आधारित परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे.

BSF Bharati 2025: भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मोहीम २४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत असून, २३ सप्टेंबर २०२५ ही शेवटची मुदत आहे.

रिक्त पदांचा तपशील

या भरतीअंतर्गत एकूण 1121 पदांची भरती केली जाणार आहे:

हेड कॉन्स्टेबल (RO) – 910 जागा

हेड कॉन्स्टेबल (RM) – 211 जागा

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल:

शारीरिक मानक चाचणी (PST)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

संगणक आधारित परीक्षा (CBT)

कागदपत्रांची पडताळणी

CBT परीक्षा फक्त हिंदी व इंग्रजी भाषेत घेण्यात येईल. ही परीक्षा २ तासांची असेल आणि ती बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असेल. परीक्षा BSF मुख्यालयाने निश्चित केलेल्या निवडक केंद्रांवर घेण्यात येईल.

अर्ज शुल्क किती आहे?

UN / OBC / EWS पुरुष उमेदवार – ₹100 (प्रति पद)

शुल्काचे भरणे नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा CSC केंद्रांद्वारे करता येईल.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज BSF च्या अधिकृत वेबसाइटवर rectt.bsf.gov.in

जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरावा.

ही संधी गमावू नका!

आपण जर भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करत असाल, तर ही मेगाभरती तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. वेळेत अर्ज करा आणि आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप द्या!