- Home
- Utility News
- लो मेटेनन्स, हाय मायलेज कार हवी? तुमच्याकडे आहेत Maruti Suzuki आणि Hyundai चे हे 4 ऑप्शन्स!
लो मेटेनन्स, हाय मायलेज कार हवी? तुमच्याकडे आहेत Maruti Suzuki आणि Hyundai चे हे 4 ऑप्शन्स!
Best Low Budget High Mileage Maruti Suzuki Hyundai Cars : तुम्हाला कमी मेटेनन्स असलेली आणि चांगली मायलेज देणारी कार हवी आहे का? मग तुमच्याकडे मारुती सुझुकी आणि ह्युंदाईचे हे 4 बेस्ट ऑप्सन आहेत. त्यातून तुम्ही एक कार निवडू शकता.

हाय मायलेज कार्स
काही कार्सचे मायलेज चांगले असते. विशेष म्हणजे ही कार हाताळण्यासाठी पैसेही कमी खर्च करावे लागतात. ग्राहक अशा कारच्या शोधात असतात. अशा 4 कार आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत. कार खरेदी करताना त्यातील एक कार तुम्ही निवडू शकता. या कार चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. तसेच त्यांच्या मेटेनेन्सचा खर्चही कमी आहे.
मारुती वॅगनआर
वॅगनआर उत्तम पर्याय आहे. किंमत ₹4.98 लाखांपासून. पेट्रोलवर 25 km/l आणि CNG वर 34.05 km/kg मायलेज देते. यात AMT, टचस्क्रीन आणि 6 एअरबॅग्जसारखे फीचर्स आहेत.
मारुती डिझायर टूर एस
चांगली क्वालिटी, मायलेज आणि कमी मेंटेनन्ससाठी डिझायर टूर एस उत्तम आहे. किंमत ₹6.24 लाखांपासून. पेट्रोलवर 26.06 km/l आणि CNG वर 34 km/kg मायलेज देते.
ह्युंदाई ऑरा
तुमच्या कारला प्रीमियम लुक देण्यासाठी ह्युंदाई ऑरा एक चांगला पर्याय आहे. किंमत ₹5.98 लाखांपासून. पेट्रोलवर 24.7 km/l आणि CNG वर 28 km/kg मायलेज देते. स्टायलिश इंटीरियर आणि आरामदायी सीटिंग हे वैशिष्ट्य आहे.
मारुती एर्टिगा
मोठ्या कुटुंबासाठी मारुती एर्टिगा (MPV) बेस्ट आहे. किंमत ₹8.80 लाखांपासून. पेट्रोलवर 20.51 km/l आणि CNG वर 26.11 km/kg मायलेज. फॅमिली टूर, ऑफिस ट्रिपसाठी ही कार उत्तम आहे.

