MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० जागांसाठी मेगा भरती; विनापरीक्षा मिळणार नोकरी, असा करा अर्ज

पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० जागांसाठी मेगा भरती; विनापरीक्षा मिळणार नोकरी, असा करा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2026 : बँक ऑफ महाराष्ट्रने पदवीधरांसाठी ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना, केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 16 2026, 06:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० जागांसाठी मेगा भरती
Image Credit : Getty

पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० जागांसाठी मेगा भरती

पुणे : जर तुम्ही पदवीधर (Graduate) असाल आणि नामांकित सरकारी बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने तब्बल ६०० शिकाऊ उमेदवारांची (Apprentices) भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 

26
विनापरीक्षा निवडीची सुवर्णसंधी
Image Credit : Getty

विनापरीक्षा निवडीची सुवर्णसंधी

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड ही कोणत्याही कठीण परीक्षेविना, केवळ 'गुणवत्तेच्या' (Merit) आधारावर केली जाणार आहे. पदवीच्या गुणांवर आधारित तुमची निवड होऊ शकते, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
दहावी पास आहात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ५७२ जागांसाठी मेगाभरती सुरू; असा करा अर्ज
Related image2
UCO Bank Recruitment 2026 : युको बँकेत सरकारी नोकरीचा धमाका! पदवीधरांना मोठी संधी, पगार ₹93,000 पर्यंत; असा करा अर्ज
36
भरतीबद्दल महत्त्वाची माहिती
Image Credit : unsplash

भरतीबद्दल महत्त्वाची माहिती

एकूण पदे: ६०० (अप्रेंटिस)

वयोमर्यादा: २० ते २८ वर्षे.

शिक्षण: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण.

महत्त्वाची अट: उमेदवाराला स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे आवश्यक आहे. (१० वी किंवा १२ वी स्थानिक भाषेतून उत्तीर्ण असणे अनिवार्य). 

46
अर्ज करण्याची मुदत
Image Credit : Getty

अर्ज करण्याची मुदत

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २५ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. वेळ कमी असल्याने शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित नोंदणी करणे फायदेशीर ठरेल. 

56
अर्ज कसा करावा? (Step-by-Step)
Image Credit : social media

अर्ज कसा करावा? (Step-by-Step)

१. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला bankofmaharashtra.in भेट द्या.

२. 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'Apprenticeship' लिंकवर क्लिक करा.

३. नवीन नोंदणी (New Registration) करून लॉग-इन करा.

४. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.

५. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

६. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा. 

66
अप्रेंटिसशिपचे फायदे काय?
Image Credit : Bankofmaharashtra.in

अप्रेंटिसशिपचे फायदे काय?

अप्रेंटिसशिप हा केवळ एक जॉब नसून ते कामाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आहे. साधारणपणे ६ महिने ते १ वर्षाच्या या कालावधीत तुम्हाला बँकेचे कामकाज शिकता येईल. हा अनुभव भविष्यात इतर बँका किंवा खासगी वित्तीय संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
HDFC बँकेच्या ग्राहकांनो सावधान! १ एप्रिलपासून ATM मधून UPI ने पैसे काढणे महागणार; पाहा काय बदलले नियम
Recommended image2
हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही नक्की 'कोण' आहात? सदस्यांचे ५ प्रकार आणि कोणाला असतात मतदानाचे अधिकार; जाणून घ्या नियम
Recommended image3
8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार? मेडिकल अलाउन्स थेट २० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता!
Recommended image4
Smartphone Launches: वर्षाच्या सुरुवातीलाच का होतो नव्या फोन्सचा धडाका? जाणून घ्या 'आतली' गोष्ट
Recommended image5
Gold Dokiya Mangalsutra: मिनिमल नाही, मॉडर्न जमाना! पाहा ढोकिया चेनवाले 7 लेटेस्ट मंगळसूत्र डिझाइन्स
Related Stories
Recommended image1
दहावी पास आहात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ५७२ जागांसाठी मेगाभरती सुरू; असा करा अर्ज
Recommended image2
UCO Bank Recruitment 2026 : युको बँकेत सरकारी नोकरीचा धमाका! पदवीधरांना मोठी संधी, पगार ₹93,000 पर्यंत; असा करा अर्ज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved