- Home
- Utility News
- Baldness Affect Fertility : टक्कल असलेल्या पुरुषांना खरंच वंध्यत्वाची समस्या येते का? हे आहे सत्य!
Baldness Affect Fertility : टक्कल असलेल्या पुरुषांना खरंच वंध्यत्वाची समस्या येते का? हे आहे सत्य!
Baldness Affect Fertility : पुरुषांना टक्कल पडणे हे वंध्यत्वाच्या समस्येचे लक्षण आहे का? अभ्यासात काय समोर आले आहे आणि तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, ते जाणून घेऊया.

टक्कल आणि हार्मोन्सचा काय संबंध?
काही पुरुषांचे केस विशीतच गळायला लागतात, ज्यामुळे टक्कल पडते. यामागे हार्मोन्सचे असंतुलन हे एक प्रमुख कारण असू शकते. असे झाल्यास पुरुषांचे केस गळायला लागतात. यावेळी त्यांनी कोणताही उपाय केला तरी ते गळायचे थांबत नाहीत.
टक्कल आणि शुक्राणूंची गुणवत्ता
टेस्टोस्टेरॉन आणि DHT हे हार्मोन्स केसांच्या वाढीवर आणि प्रजनन प्रक्रियेवर परिणाम करतात. काही अभ्यासांनी टक्कल आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेत संबंध दर्शवला आहे. म्हणजेच टक्कल असलेल्या लोकांच्या शुक्राणूंची गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी असते असे सांगितले गेले आहे.
केसगळतीची कारणे आणि उपाय
ज्या पुरुषांमध्ये DHT हार्मोन जास्त असतो, त्यांच्यात केसगळती जास्त होते. ज्यांना लवकर टक्कल पडते, त्यांच्यात अँड्रोजन हार्मोनची पातळी जास्त असू शकते. त्यामुळे केस गळतीमागे हार्मोन्स असल्याचे दिसून येते.
अभ्यासात काय समोर आले?
'अँड्रोलॉजीया' जर्नलनुसार, तीव्र टक्कल असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी असल्याचे आढळले. हे टक्कल आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेतील संबंध दर्शवते. त्यामुळे अशा लोकांनी कधी कधी वंधत्याच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. पण योग्य औषोधोपचार केल्यास त्यावर समाधान निघू शकते.
हार्मोन्सचे असंतुलन आणि प्रजनन क्षमता
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शुक्राणूंची संख्या किंवा त्यांच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो. पण यामुळे वंध्यत्व येतेच असे नाही, फक्त शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे बरेच वेळा अशा पुरुषांच्या पत्नी गर्भवती होण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. लगेच त्या गर्भवती होत नाहीत.
निरोगी जीवनशैली हाच उपाय
केसांचे आणि प्रजननाचे आरोग्य दोन्ही हार्मोन्सवर अवलंबून असते. व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीमुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि दोन्ही समस्या टाळता येतात. यासाठी जिवनशैली अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येते.
वैयक्तिक आयुष्यावर परिणाम
टक्कल पडल्याने या पुरुषांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. बाळ लवकर होत नसल्याने नवरा-बायको यांचे संबंध ताणले जाऊ शकतात. दोघांमध्ये भांडण होऊ शकते. त्यामुळे संतुलित जिवनपद्धती योग्य असते.
केशरोपण
काही लोक डोक्यावर केस राहावेत म्हणून केसरोपण करतात. पण त्यामुळे केवळ बाह्य सजावट होते. त्यामुळे शारीरिक हार्मोन्सचे संतुलन साधले जात नाही. त्यासाठी योग्य जिवनशैलीत महत्त्वाची ठरते.

