- Home
- Utility News
- Ayushman Card : आयुष्मान कार्डसंबंधी महत्त्वाचा बदल, ‘या’ आजारांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत
Ayushman Card : आयुष्मान कार्डसंबंधी महत्त्वाचा बदल, ‘या’ आजारांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत
Ayushman Card : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत काही विशिष्ट आजारांवरील मोफत उपचार आता केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असतील. मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया, प्रसूती आणि गर्भाशयावरील शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध राहणार नाहीत.

Ayushman Bharat Yojana : देशभरात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळते. या योजनेअंतर्गत सरकारी तसेच नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत उपचाराची सोय आहे. मात्र, केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून काही ठराविक आजारांवरील मोफत उपचार आता केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच मिळणार आहेत.
आता 'हे' उपचार खासगी रुग्णालयात मोफत मिळणार नाहीत
आरोग्य विभागाच्या नव्या निर्देशानुसार, मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया, प्रसूती व गर्भाशयावरील शस्त्रक्रिया यांसारख्या उपचारांची सुविधा यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाणार नाही. हे सर्व उपचार आता केवळ सरकारी रुग्णालयांमधूनच मोफत मिळतील. त्यामुळे अशा उपचारांसाठी खासगी रुग्णालयात जावे लागल्यास, रुग्णांना खर्च स्वतः करावा लागणार आहे.
हा निर्णय का घेतला?
पूर्वी आयुष्मान योजनेअंतर्गत 1760 प्रकारच्या आजारांवर खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत होते. मात्र, यापैकी काही आजारांवर पुरेशा प्रमाणात आणि दर्जेदार उपचार सरकारी रुग्णालयांतूनच शक्य होत असल्याने, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांतून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवेचा समावेश रद्द करण्यात आला आहे.
आयुष्मान कार्ड कसे काढायचे?
आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
तुमच्या मोबाईलमध्ये 'Ayushman Bharat' अॅप डाउनलोड करा.
भाषा निवडून लॉगिन करा व ‘Beneficiary’ वर क्लिक करा.
कॅप्चा कोड व मोबाईल नंबर टाका.
PM-JAY योजना निवडा. राज्य, जिल्हा व आधार क्रमांक भरून लॉगिन करा.
तुमच्या कुटुंबातील पात्र सदस्यांची यादी दिसेल.
ज्यांचे कार्ड तयार नाही, त्यांच्या नावासमोर ‘Authenticate’ असा पर्याय दिसेल.
Authenticate वर टॅप करून आधार क्रमांक व OTP टाका.
फोटो, मोबाईल नंबर, नाते व ई-केवायसी पूर्ण करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर ७ दिवसांत व्हेरिफिकेशन होईल व कार्ड अॅपवरून डाउनलोड करता येईल.
कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मोबाईल नंबर
रेशन कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
तसेच, कामगार कार्ड / ई-श्रम कार्ड / सरकारी ओळखपत्र (अर्ज करण्याची पात्रता तपासण्यासाठी)
जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही आजारांनी त्रस्त असाल, तर सरकारी रुग्णालयात तातडीने संपर्क साधा. खासगी रुग्णालयांमध्ये यापुढे त्या उपचारांसाठी मोफत सेवा मिळणार नाही.

