- Home
- Utility News
- Axis Credit Card : ॲक्सिस बँकेकडून मोठे बदल, 28 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डसाठी नवे नियम, खिशाला बसणार चाप
Axis Credit Card : ॲक्सिस बँकेकडून मोठे बदल, 28 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डसाठी नवे नियम, खिशाला बसणार चाप
ॲक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने क्रेडिट कार्डचे नियम आणि शुल्कांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नवीन नियम 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहेत.

ग्राहकांना मोठा भार

उशिरा पेमेंट केल्यास महागडं शुल्क (Late Payment Fees Changed)
जर तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरायला विसरलात, तर बँक तुमच्याकडून विलंब शुल्क (Late Fee) आकारते. बँकेने आता या शुल्कात बदल केले आहेत. विशेषतः 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असेल तर मोठा दंड भरावा लागेल. विविध थकबाकीच्या रकमांसाठी नवीन शुल्कांची यादी खालीलप्रमाणे आहे: -
- 500 रुपयांपर्यंत: कोणतेही विलंब शुल्क नाही
- 501 ते 5,000 रुपयांपर्यंत: 500 रुपये शुल्क
- 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंत: 750 रुपये शुल्क
- 10,001 ते 50,000 रुपयांपर्यंत: 1,200 रुपये शुल्क
- 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर: 1,300 रुपये विलंब शुल्क
पेमेंट सेटलमेंटचा नवा क्रम (Payment Settlement Priority)
डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) शुल्कात वाढ
आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा परदेशी वेबसाइटवर भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करताना आकारले जाणारे डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) मार्कअप शुल्क 1.5 टक्क्यांवरून थेट 3.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. (मात्र, मॅग्नस कार्डसाठी हे शुल्क 2 टक्के असेल). यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा भारतीय चलनात परदेशी पेमेंट करणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे.
एअरपोर्ट लाउंज प्रवेशाचे नियम (Airport Lounge Access Rules)
गिफ्ट कार्ड आणि टोल पेमेंटवर रिवॉर्ड्स नाहीत
गिफ्ट कार्ड खरेदीवर आता कोणत्याही प्रकारचे रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक मिळणार नाही. या खर्चांना 'वॉलेट' खर्चांच्या विभागातून काढून 'गिफ्ट कार्ड्स' या वेगळ्या विभागात टाकले जाईल. तसंच, टोल पेमेंट, रोड टॅक्स आणि ब्रिज फी भरण्यावरही आता कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांनी हे नवीन बदल लक्षात घेऊन आपली मासिक बिलं वेळेवर भरणं महत्त्वाचं आहे. उशिरा पेमेंट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील वाढीव शुल्काचा फटका टाळण्यासाठी आतापासूनच काळजी घ्या.

