Amazon Pay Gift Cards Rakshabandhan Offers : अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड्सने खास रक्षाबंधनासाठी ऑफर्सची घोषणा केली आहे. या कार्ड्सवर कॅशबॅक, विविध सूट आणि पर्सनलाइज राखी गिफ्ट बॉक्सेस मिळणार आहेत. जाणून घ्या काय आहे आणखी खास?
मुंबई : अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड्सने आज रक्षाबंधन उत्सवाच्या ऑफर्सची घोषणा केली, ज्यामध्ये सेम-डे आणि नेक्स्ट-डे डिलिव्हरीसह फिजीकल गिफ्ट कार्ड्ससाठी प्रीमियम राखी गिफ्ट बॉक्सेस प्रमुख आकर्षण आहेत. या फेस्टिव्ह लाइनअपमध्ये फिजीकल कार्ड्सवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, ई-गिफ्ट कार्ड्सवर १५० रूपयांपर्यंतची सूट, जेन एआयवर आधारित नवीन पर्सनलायझेशन वैशिष्ट्ये आणि अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी फ्लॅट २ टक्के अमर्याद कॅशबॅकचा समावेश आहे. गिफ्ट कार्ड्सची सुरुवात फक्त १० रूपयांपासून होते आणि अॅमेझॉनवरील १५ कोटींपेक्षा जास्त उत्पादनांवर, तसेच २०,००० पेक्षा जास्त पार्टनर अॅप्सवर फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ग्रॉसरी आणि गेमिंगपर्यंत रीडिम करता येतात.
वाढदिवस, लग्नसमारंभ आणि दिवाळी यांसोबत रक्षाबंधन हा भारतातील सर्वात मोठ्या भेटवस्तू (गिफ्टिंग) देण्याच्या उत्सवांपैकी एक आहे. भारतातील १३ शहरांमध्ये अॅमेझॉन पेने केलेल्या संशोधनामधून आढळून आले की, प्रत्येक भेटवस्तूच्या मागे भावना ही मुख्य गोष्ट असते, पण त्या भावनेला परिपूर्ण भेटवस्तूचे रूप देणे कठीण ठरते. ३५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींनी वेळेची कमतरता किंवा खरोखर विचारपूर्वक काहीतरी शोधण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे याचे कारण असल्याचे सांगितले. भावा-बहिणीच्या या सणासाठी, रोख रक्कम प्रदीर्घ काळापासून एक सुरक्षित आणि सर्वमान्य पर्याय राहिला आहे. गिफ्ट कार्ड्स आकर्षक अपग्रेड प्रदान करतात, जे रोख रकमेइतकीच स्थिरता देण्यासोबत अधिक वैयक्तिक आणि आपुलकीचे वाटतात.
"आमचा विश्वास आहे की, प्रत्येक राखी शेवटच्या क्षणी दिलेल्या रोख रकमेच्या पाकिटापेक्षा अधिक पात्र आहे. या लाँचद्वारे, आम्ही फिजीकल गिफ्ट उघडण्याच्या आनंदाला आपल्याला खरोखर काय हवे आहे ते निवडण्याच्या स्वातंत्र्याशी जोडले आहे आणि त्यात एआय-आधारित पर्सनलायझेशनचा समावेश केला आहे, ज्यामुळे प्रत्येक कार्ड खास आणि वेगळे वाटेल. हे तणावमुक्त आणि विचारपूर्वक दिलेले गिफ्टिंग आहे," असे अॅमेझॉन पे च्या स्टोअर्ड व्हॅल्यू अँड गिफ्टिंगच्या डायरेक्टर नेहा गुप्ता महातमे म्हणाल्या.
यंदा रक्षाबंधनाला, फिजीकल गिफ्ट कार्ड्स खास डिझाइन केलेल्या प्रीमियम राखी गिफ्ट बॉक्सेसमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे गिफ्ट कार्ड हे भावा-बहिणींना हातात धरता येईल आणि उघडता येईल अशा स्वरूपात मिळते. शेवटच्या क्षणी भेटवस्तू देऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे बॉक्सेस सेम-डे डिलिव्हरीसह उपलब्ध आहेत, तर आधीच नियोजन करणाऱ्यांसाठी निवडक शहरांमध्ये आणि सेवेसाठी उपलब्ध पिनकोड्सवर नेक्स्ट-डे डिलिव्हरीसह उपलब्ध आहेत, ज्यामुळे भेटवस्तू वेळेवर आणि देण्यासाठी तयार स्वरूपात पोहोचेल. फिजीकल गिफ्ट कार्ड्सच्या खरेदीवर ग्राहक ५ टक्क्यांपर्यंत* बचत करू शकतात.
ई-गिफ्ट कार्ड्स व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे त्वरित (इन्स्टंट) पाठवले जाऊ शकतात, ज्यांच्या खरेदीवर १५० रूपयांपर्यंत कॅशबॅक* मिळू शकते. रक्षाबंधनासाठी नवीन पर्सनलायझेशन वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे -
- फोटो अपलोड - भावंडासोबत आवडता फोटो जोडून कस्टम कार्ड तयार करा. अपलोड केलेले फोटो फक्त कार्ड पर्सनलायझेशनसाठी वापरले जातात आणि अॅमेझॉनच्या प्रायव्हसी नोटीसनुसार हाताळले जातात.
- राखी-थीम असलेली अॅनिमेटेड डिझाइन्स - या सणासाठी खास क्युरेट केलेल्या सणासुदीच्या अॅनिमेटेड डिझाइन्स.
- एआय-जनरेटेड डिझाइन्स - प्राप्तकर्त्याच्या (ज्याला गिफ्ट द्यायचे आहे) व्यक्तिमत्त्वाला साजेसे जेन एआयद्वारे डिझाइन केलेले व्हिज्युअल्स.
अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड -
अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना या रक्षाबंधनाला गिफ्ट कार्ड्सच्या सर्व खरेदीवर फ्लॅट २ टक्के अमर्याद कॅशबॅक* मिळेल. यासाठी ठरावि नियम आणि अटी लागू असतील.


