MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • UPI Payments : यूपीआय चार्जेसचा भुर्दंड टाळायचाय? व्यापाऱ्यांसाठी 5 सोप्या ट्रिक्स

UPI Payments : यूपीआय चार्जेसचा भुर्दंड टाळायचाय? व्यापाऱ्यांसाठी 5 सोप्या ट्रिक्स

सरकारने युपीआय पेमेंट्सवर चार्जेस लावायला हिरवा कंदील दिलाय. तुम्हालाही युपीआय पेमेंट्सवरील 'एमडीआर'चा (MDR) भुर्दंड कमी करायचाय का? नियमांच्या चौकटीत राहून व्यापारी या चार्जेसपासून कसे वाचू शकतात, हे या ५ सोप्या ट्रिक्समधून समजून घेऊया.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 17 2026, 09:54 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
यूपीआय एमडीआर नियम: व्यापाऱ्यांची चिंता वाढली
Image Credit : Asianet News

यूपीआय एमडीआर नियम: व्यापाऱ्यांची चिंता वाढली

डिजिटल पेमेंट्सच्या जमान्यात युपीआयने आपले व्यवहार खूप सोपे केलेत. पण १५ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मर्चंट युपीआय पेमेंट्सवर ०.४% एमडीआर (Merchant Discount Rate) लागू होणार आहे. या चार्जेसमुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच चिंता वाढलीये. ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देतानाच आपला खर्च आटोक्यात ठेवणं प्रत्येक व्यापाऱ्यासाठी गरजेचं बनलंय. एमडीआरचा हा भार कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
पर्सनल क्यूआर कोडचा हुशारीने वापर
Image Credit : Gemini AI

पर्सनल क्यूआर कोडचा हुशारीने वापर

अनेक छोटे व्यापारी त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याला लिंक असलेला पर्सनल क्यूआर कोड वापरतात. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला (P2P) पैसे पाठवताना सामान्य मर्चंट एमडीआर चार्जेस लागत नाहीत. पण, व्यावसायिक पेमेंट्स मुद्दाम पर्सनल व्यवहार म्हणून दाखवणं हा बँकिंग नियमांचा भंग ठरतो. म्हणूनच व्यापाऱ्यांनी बँक आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नियमांनुसार योग्य क्यूआर कोड निवडणं फायद्याचं ठरतं.

Related Articles

Related image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
36
छोट्या पेमेंट्ससाठी यूपीआय लाईट
Image Credit : Gemini AI & x.com/NPCI_NPCI

छोट्या पेमेंट्ससाठी यूपीआय लाईट

छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी यूपीआय लाईट (UPI Lite) खूप उपयोगी पडतं. यामुळे बँकेच्या सर्व्हरवर ताण न येता पेमेंट लगेच पूर्ण होतं. पण, मोठ्या पेमेंट्सवर लागणारा एमडीआर टाळण्याचा मार्ग म्हणून याकडे बघू नका. छोटे पेमेंट्स विनाअडथळा आणि वेगाने पूर्ण करणं, हाच याचा मुख्य उद्देश आहे.

46
मोठ्या बिलांचे भाग करणे
Image Credit : Getty

मोठ्या बिलांचे भाग करणे

५,००० किंवा १०,००० रुपयांसारखी मोठी बिले २,००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या भागांत विभागून घेणं, हा एक पर्याय वाटू शकतो. पण, फक्त चार्जेस वाचवण्यासाठी बिलांचे मुद्दाम तुकडे केल्यास व्यापाऱ्याला दंड बसू शकतो. त्यामुळे ही पद्धत वापरण्यापूर्वी पेमेंट ॲग्रिगेटरचे नियम नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

56
थेट बँक खात्यात ट्रान्सफर
Image Credit : Asianet News

थेट बँक खात्यात ट्रान्सफर

व्यापारी आपल्या ग्राहकांकडून थेट बँक खात्यात पैसे घेण्याचा पर्याय निवडू शकतात. यात युपीआय अकाउंट-टू-अकाउंट ट्रान्सफरसोबतच आयएमपीएस (IMPS) किंवा एनईएफटी (NEFT) सारख्या पद्धती वापरता येतात. या पद्धतीमुळे पेमेंट ॲग्रिगेटर किंवा मर्चंट वॉलेटकडून लागणाऱ्या अतिरिक्त चार्जेसपासून सुटका मिळते. पण, या सेवांवर बँक किती सर्व्हिस चार्ज लावते, हे आधीच तपासून पाहणं गरजेचं आहे.

66
स्टॅटिक क्यूआरने वाचवा डिव्हाइस रेंटल
Image Credit : Asianet News

स्टॅटिक क्यूआरने वाचवा डिव्हाइस रेंटल

प्रत्येक छोट्या व्यापाऱ्याला महागडी पॉईंट ऑफ सेल (POS) मशीन किंवा साऊंडबॉक्स घेण्याची गरज नाही. बँकेचा साधा स्टॅटिक क्यूआर कोड वापरून तुम्ही डिव्हाइसचं भाडं आणि महिन्याची मेंटेनन्स फी सहज वाचवू शकता. पण लक्षात ठेवा, एमडीआर लागणं हे क्यूआर कोड स्टॅटिक आहे की डायनॅमिक यावर अवलंबून नसतं, तर ते मर्चंटच्या रजिस्टर्ड कॅटेगरीवर ठरतं.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
AERO Token: एरोड्रोम-व्हेलोड्रोम विलीनीकरणापूर्वी AERO टोकनमध्ये मोठी उसळी, को-फाउंडर म्हणाले 'धमाका होणार'
Recommended image2
Semiconductor Revolution: AI च्या युगात भारताची पुढची मोठी क्रांती! योग्य चिप्सच ठरवणार यशाचं रहस्य - राजीव चंद्रशेखर
Recommended image3
Peanuts And Water: शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी का पिऊ नये? यामागे काही वैज्ञानिक सत्य आहे का?
Recommended image4
Laptop Health Tips: तासनतास लॅपटॉपवर काम करताय? मग पाठ आणि मानेची वाट लागणारच! हे ७ उपाय करा आणि टेन्शन फ्री राहा
Recommended image5
Online Shopping Discount : 999 ची वस्तू 499 ला? समजून घ्या मार्केटिंगचं गणित
Related Stories
Recommended image1
UPI Transaction Fee : यूपीआय व्यवहारांवरील शुल्कावर आरबीआयचं स्पष्टीकरण, 'डिजिटल पेमेंट मजबूत करण्यासाठी पाऊल'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved