तुमच्याही घराचं छत रिकामं पडून आहे का? मग आता त्याच छताचा वापर करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. जाणून घ्या या ५ गोष्टी ज्यातून तुम्ही कमाई करू शकता.
मुंबई : तुमच्या घराच्या छतावर फक्त भंगार किंवा वाळत घातलेले कपडेच दिसतात का? पण आजकाल लोक याच रिकाम्या छताचा वापर करून जबरदस्त कमाई करत आहेत. तुम्हीही कोणताही मोठा खर्च न करता तुमच्या छतामधून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवू शकता.
सोलर पॅनल लावा, सरकारकडून पैसेही मिळवा
आजकाल विजेच्या बिलामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. अशावेळी छतावर सोलर पॅनल बसवणं हा सर्वात स्मार्ट मार्ग आहे. यामुळे तुमच्या घरातली वीज मोफत होईल. जी अतिरिक्त वीज तयार होईल, ती तुम्ही थेट वीज विभागाला (ग्रिड) विकू शकता. विशेष म्हणजे, सरकार 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजने'अंतर्गत सोलर पॅनल लावण्यासाठी चांगली सबसिडी सुद्धा देत आहे.
मोबाईल टॉवरसाठी जागा द्या
जर तुमचं छत मजबूत असेल आणि तुमच्या घराच्या आसपास शाळा किंवा हॉस्पिटल नसेल, तर तुम्ही छतावर मोबाईल टॉवर बसवू शकता. जिओ (Jio), एअरटेल (Airtel) सारख्या टेलिकॉम कंपन्या नेटवर्क वाढवण्यासाठी नेहमीच नवीन जागांच्या शोधात असतात. यासाठी कंपन्या तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित आणि चांगलं भाडं देतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल.
होर्डिंग आणि जाहिराती लावून पैसे कमवा
तुमचं घर एखाद्या मुख्य रस्त्यावर, हायवेवर किंवा गर्दीच्या चौकात आहे का? जर हो, तर तुमचं छत म्हणजे सोन्याची खाण आहे. तुम्ही तुमच्या छतावर मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती (Ads & Billboards) लावण्यासाठी जागा भाड्याने देऊ शकता. जाहिरात एजन्सी स्वतः येऊन सगळं सेटअप लावतात, तुम्हाला फक्त जागा देण्याचं दर महिन्याला भाडं मिळत राहील.
छतावर ऑरगॅनिक भाज्या उगवा
आजकाल प्रत्येकाला केमिकलवाल्या भाज्या टाळायच्या आहेत आणि ऑरगॅनिक (नैसर्गिक) भाज्यांना मोठी मागणी आहे. तुम्ही तुमच्या छतावर कुंड्यांमध्ये किंवा ग्रो-बॅग्समध्ये (Grow Bags) टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि इतर पालेभाज्या (Terrace Farming) उगवू शकता. यालाच आपण 'गच्चीवरची बाग' म्हणतो. तुमच्या गरजेपुरत्या भाज्या घरात वापरा आणि उरलेल्या भाज्या शेजारी किंवा जवळच्या बाजारात चांगल्या दरात विका. हे आरोग्य आणि कमाईचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.
क्लाउड किचन सुरू करा
जर तुमच्या हाताला चव असेल आणि तुम्ही उत्तम जेवण बनवत असाल, तर छताचा एक भाग क्लाउड किचनमध्ये (Cloud Kitchen) बदलू शकता. क्लाउड किचन म्हणजे असं रेस्टॉरंट जिथे लोक जेवायला येत नाहीत, तर इथून फक्त जेवण पॅक होऊन स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) द्वारे लोकांच्या घरी डिलिव्हर होतं. यात दुकान भाड्याने घेण्याचा खर्च वाचतो आणि छतावर आरामात बसून तुम्ही तुमचा टिफिन किंवा फूड बिझनेस चालवू शकता.
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी तयार करण्यात आला आहे. यात सांगितलेले कमाईचे मार्ग प्रत्येक व्यक्ती, ठिकाण आणि स्थानिक नियमांनुसार बदलू शकतात. कोणताही व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित सरकारी नियम, स्थानिक प्रशासनाची परवानगी आणि तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कमाईची रक्कम ही जागा, मागणी आणि उपलब्ध सुविधांवर अवलंबून असते.

