MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Leafy Plants: फुलांशिवायही घर दिसेल सुंदर, या ५ पानांच्या रोपांनी घराला द्या नवा लुक

Leafy Plants: फुलांशिवायही घर दिसेल सुंदर, या ५ पानांच्या रोपांनी घराला द्या नवा लुक

घरात झाडं लावायची म्हटलं की आपल्याला फक्त फुलझाडं आठवतात. पण काही झाडं अशी आहेत जी फक्त पानांनी घराची शोभा वाढवतात. चला, जाणून घेऊया अशाच काही खास पानांच्या रोपांबद्दल, ज्यांना जास्त काळजीची गरज नसते.

3 Min read
Author : Marathi Desk 2
Published : Jun 08 2026, 05:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Image Credit : chatgpt.com

Home Decor झाडं म्हटलं की अनेकांना वाटतं, सौंदर्य फक्त फुलांमध्येच असतं. पण तसं अजिबात नाही. कोणतंही रोप योग्य काळजी घेतल्यास हिरवंगार आणि सुंदर दिसतं. जर तुम्ही फुलझाडं लावून कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आम्ही अशा काही पानांच्या रोपांची यादी घेऊन आलो आहोत, जी दिसायला आकर्षक आहेत आणि त्यांची जास्त काळजीही घ्यावी लागत नाही. तुम्ही ही झाडं टेरेस, बाल्कनी किंवा मुख्य दाराजवळ सहज लावू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
Image Credit : Pinterest

१. होस्टा प्लांट (Hosta Plant)

होस्टा प्लांटला त्याच्या सुंदर, रुंद आणि रंगीबेरंगी पानांमुळे ओळखतात. अनेक देशांमध्ये याला 'सावलीचा राजा' (king of shade) म्हणतात. कमी सूर्यप्रकाशातही हे चांगलं वाढतं. त्यामुळे जिथे ऊन कमी येतं, अशा फ्लॅट किंवा अपार्टमेंटसाठी हा उत्तम पर्याय आहे. या झाडाची पानं हार्ट शेपची (heart shape) असतात. पावसाळ्यात तुम्ही याला कुंडीत किंवा जमिनीत लावू शकता. यासाठी सुपीक माती वापरा.

२. एग्लोनेमा प्लांट (Aglaonema Plant)

एग्लोनेमाला 'चायनीज एव्हरग्रीन' (Chinese Evergreen) असंही म्हणतात. हे एक प्रसिद्ध इनडोअर प्लांट आहे, जे घरातील हवा शुद्ध करतं. याची पानं हलकी गुलाबी, हिरवी, चंदेरी, लाल अशा अनेक आकर्षक रंगांमध्ये येतात. याला जास्त उन्हाची गरज नसते. कामाच्या गडबडीत पाणी द्यायला विसरलात तरी चालेल, कारण हे झाड पाण्याशिवाय अनेक दिवस जगू शकतं. फेंगशुई आणि वास्तुनुसार हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणतं असं मानलं जातं.

Related Articles

Related image1
Feng Shui Plants: घरात पैसा खेचून आणतात ही झाडं, हिरवीगार ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
Related image2
Tall Indoor Plants: फ्लॅटमधली छोटी खोलीही वाटेल मोठी, घरात लावा ही ६ उंच झाडं
34
Image Credit : Pinterest

३. डिफेनबाखिया प्लांट (Dieffenbachia Plant)

हे झाड 'डंब केन' (Dumb Cane) या नावानेही ओळखलं जातं. युरोपीय देशांमध्ये याची चमकदार पानं खूप लोकप्रिय आहेत. घरात लावल्यास हे नैसर्गिकरित्या हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतं. याचा आकार मोठा असल्यामुळे हे दिसायला खूप आकर्षक आणि रॉयल वाटतं. तुम्ही याला लिव्हिंग रूम किंवा खोलीच्या कोपऱ्यात ठेवू शकता. याला रोज पाणी देण्याची गरज नसते आणि कमी प्रकाशातही हे चांगलं वाढतं. घरात वर्षानुवर्षे हिरवळ हवी असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

टीप- डिफेनबाखिया दिसायला सुंदर असलं तरी त्याचा रस विषारी असतो. चुकून पान किंवा खोड खाल्ल्यास घशात सूज येऊ शकते. घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असतील, तर हे झाड त्यांच्यापासून दूर ठेवा आणि छाटणी करताना नेहमी ग्लोज वापरा.

44
Image Credit : Pinterest

४. क्रोटन प्लांट (Croton Plant)

क्रोटन हे इनडोअर आणि आऊटडोअर दोन्हीसाठी उत्तम आहे. याची पानं फक्त हिरवीच नाहीत, तर लाल, पिवळी, निळी, नारंगी, गुलाबी अशा अनेक रंगांची असतात. घराला रंगीबेरंगी लुक देण्यासाठी हे झाड नक्की लावा. हे फक्त दिसायला सुंदर नाही, तर घरातील विषारी घटक शोषून हवा शुद्ध करतं. याला पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. एकदा नीट वाढल्यावर हे झाड वर्षानुवर्षे टिकतं आणि सर्व ऋतूंमधील तापमान सहज सहन करतं.

काळजी- क्रोटनचा दुधासारखा रस थोडा विषारी असतो. त्वचेच्या संपर्कात आल्यास खाज सुटू शकते. त्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. कटिंग केल्यानंतर लगेच हात धुवा.

५. फिटोनिया प्लांट (Fittonia Plant)

फिटोनियाचं सौंदर्य त्याच्या लहान, चमकदार पानांमध्ये आहे. हे एक छोटंसं रोप आहे जे हळूहळू वाढतं. तुम्ही याला सोफा टेबल, स्टडी टेबल किंवा कॉर्नर टेबलवर ठेवू शकता. या रोपाला ओलावा आवडतो, त्यामुळे याला काचेच्या भांड्यात किंवा टेरारियममध्ये (terrarium) ठेवणं चांगलं. जर तुम्ही साध्या कुंडीत लावत असाल, तर पाण्याकडे लक्ष ठेवा. पाणी कमी झाल्यास ते लगेच सुकतं, पण खराब होत नाही. पुन्हा पाणी दिल्यावर ते लगेच ताजंतवानं दिसू लागतं.

About the Author

MD
Marathi Desk 2
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Diamond Rings : डोळे दिपवणारे डिझाइन्स; अशी एक तरी डायमंड रिंग तुमच्याकडे हवीच!
Recommended image2
Bespoke Design: बंगळूरमध्ये आता 'रेडिमेड' नाही, 'आपल्याला हवं तसं' इंटिरियर डिझाइन का होतंय लोकप्रिय?
Recommended image3
१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास
Recommended image4
Hair Loss: केस प्रत्यारोपण करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे
Recommended image5
श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
Related Stories
Recommended image1
Feng Shui Plants: घरात पैसा खेचून आणतात ही झाडं, हिरवीगार ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
Recommended image2
Tall Indoor Plants: फ्लॅटमधली छोटी खोलीही वाटेल मोठी, घरात लावा ही ६ उंच झाडं
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved