Gold Earrings : आजकाल साधे स्टड-हूप किंवा पारंपरिक झुमक्यांपेक्षा लटकन असलेल्या कानातल्यांची फॅशन सगळीकडे पाहायला मिळतात. हे कानातले कोणत्याही ड्रेसवर छान दिसतात. विशेष म्हणजे, फक्त १ ग्राम सोन्यातही तुम्ही हे स्टायलिश इअररिंग्स बनवू शकता. चला तर मग पाहूया असेच काही खास डिझाइन्स.
तुमचा ड्रेस कितीही भारी असला तरी, त्याला शोभेल अशी स्टायलिश ज्वेलरी नसेल तर लूक परिपूर्ण होत नाही. म्हणूनच आजकाल मुलींमध्ये साध्या स्टड-हूप किंवा पारंपरिक झुमक्यांपेक्षा लटकन असलेल्या इअरिंग्ज म्हणजे कर्णभूषणची मागणी वाढलेली पाहायला मिळते. इअरिंग्ज दिसायला खूप क्लासी वाटतात. जर तुम्हालाही रोजच्या वापरासाठी किंवा पार्टी-फंक्शनसाठी सारखे-सारखे कानातले बदलण्याचा कंटाळा आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुमच्यासाठी २२ कॅरेट सोन्यातील लटकन असलेले काही रॉयल डिझाइन्स घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फक्त १ ग्राम सोन्यात सहज बनवू शकता.


ट्रेडिशनल लटकन स्टड चेन इअररिंग
जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी क्लासिक आणि एलिगेंट लूक हवा असेल, तर हे ट्रेडिशनल फ्लोरल स्टड चेन इअररिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात फुलांचं नाजूक नक्षीकाम आणि त्याला जोडलेली लटकन चेन खूपच स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसते. हा डिझाइन तुमच्या ऑफिस वेअरपासून ते पारंपरिक कपड्यांपर्यंत सगळ्यांवर छान दिसेल.
मयूर मोटिफ गोल्ड इअररिंग
मोराच्या डिझाइनवाले म्हणजेच मयूर मोटिफ असलेले कर्णभूषण कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत. हे डिझाइन खूप क्लासिक आणि गर्ली लूक देतं. यावर केलेलं भारी नक्षीकाम आणि इनामेल वर्क लक्ष वेधून घेतं. सोबत असलेल्या छोट्या-छोट्या चेन लटकनमुळे याला एक प्रीमियम आणि लग्झरी फील येतो. हे कानातले तुम्ही रोजच्या वापरापासून ते लग्नसमारंभातही घालू शकता.
मीनाकारी झुमकी लटकन डिझाइन
ज्या महिलांना फॅन्सी गोल्ड इअररिंग आवडतात, त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट पीस आहे. हे डिझाइन तुम्हाला एकाच वेळी ट्रेंडी आणि मिनिमल ग्लॅमरस टच देईल. मध्यभागी असलेला रुबी स्टोन आणि बाजूला पानांच्या आकाराचं डिझाइन याला एक मॉडर्न फ्यूजन लूक देतं. तुम्ही तुमच्या डेली लग्झरी लाइफस्टाइलसाठी याचा नक्की विचार करू शकता. हे कोणत्याही कार्यक्रमात सहज कॅरी करता येतात.

स्लीक सुई-धागा गोल्ड १ ग्राम
ज्या महिलांना हलके आणि नाजूक दागिने आवडतात, त्यांच्यासाठी १ ग्राम सोन्यातील सुई-धागा हा एक टिकाऊ आणि स्वस्त पर्याय आहे. हे कोणत्याही ड्रेसवर एफर्टलेस एलिगन्स लूक देतात. याच्या टॉपला एक छोटंसं, गोंडस फूल आहे, ज्यामुळे याची चेन आणखी आकर्षक आणि ट्रेंडी दिसते. तुम्ही हे कानातले कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसोबत घालून प्रसंगांनुसार वापरू शकता.
स्टोन असलेले लीफ इअररिंग
तुमच्या फॅशनमध्ये आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही पानांच्या डिझाइनचे आणि स्टोन लावलेले लटकन इअररिंग नक्की ट्राय करू शकता. हा एक कंटेम्पररी पीस आहे जो तुमच्या कानांचं सौंदर्य १०० पटींनी वाढवतो. यावर पांढऱ्या खड्यांचं बारीक काम आणि लटकत्या चेनमध्ये मण्यांचं काम केलेलं आहे. हे ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर फ्यूजन स्टाईल देतात. हे घातल्यावर तुम्हाचा आत्मविश्वास नक्की वाढू शकतो.


