MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Car Loan : नवीन कार घेताय? कमी व्याज आणि प्रोसेसिंग फीमध्ये सूट देणाऱ्या 4 बँका

Car Loan : नवीन कार घेताय? कमी व्याज आणि प्रोसेसिंग फीमध्ये सूट देणाऱ्या 4 बँका

दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर इंडियन बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक कार लोनवर खास ऑफर्स देत आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 05 2026, 10:23 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कार लोन घेण्यापूर्वी या ४ बँकांच्या ऑफर्स नक्की पाहा
Image Credit : State Bank of India/FB

कार लोन घेण्यापूर्वी या ४ बँकांच्या ऑफर्स नक्की पाहा

तुम्ही नवीन कार घेण्याचा प्लॅन करत आहात का? कारच्या किमतीसोबतच लोनवरील व्याज आणि इतर चार्जेसकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. दिवाळी २०२६ च्या सणासुदीच्या काळात काही बँका कार लोनवर कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीमध्ये सूट देत आहेत. यामध्ये इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक या चार बँकांच्या ऑफर्स लक्ष वेधून घेत आहेत. ग्राहकाची पात्रता, लोनची रक्कम आणि कालावधी यावर प्रत्येक बँकेचा व्याजदर आणि चार्जेस अवलंबून असतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
इंडियन बँक – ७.७५% पासून व्याजदर सुरू
Image Credit : Asianet News

इंडियन बँक – ७.७५% पासून व्याजदर सुरू

इंडियन बँक कार लोनवर वार्षिक ७.७५% पासून व्याजदर आकारत आहे. विशेष म्हणजे, या बँकेत सध्या प्रोसेसिंग फी माफ करण्यात आली आहे. यामुळे लोन घेताना सुरुवातीला होणारा खर्च वाचू शकतो. पण लक्षात ठेवा, ७.७५% हा फक्त सुरुवातीचा दर आहे; सर्वांना याच दराने लोन मिळेल असं नाही. तुमची पात्रता आणि बँकेच्या अटींनुसार अंतिम व्याजदर ठरेल. अर्ज करण्यापूर्वी बँकेत जाऊन सध्याचे दर नक्की तपासा.

Related Articles

Related image1
Used Car Buying Guide : जुनी कार घेताय? मग या 5 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर फसाल
Related image2
Diwali Car Offers : दिवाळीत कार खरेदीवर बंपर डिस्काउंट; 4.99 लाखांच्या कारवर भन्नाट ऑफर्स
36
एसबीआय – कार लोनच्या चार्जेसमध्ये खास सूट
Image Credit : HDFC bank

एसबीआय – कार लोनच्या चार्जेसमध्ये खास सूट

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील कार लोनवर सणासुदीच्या ऑफर्स देत आहे. दिवाळीच्या काळात बँक व्याजदरात सवलत आणि प्रोसेसिंग फीमध्ये सूट देत आहे. पण ही ऑफर किती काळासाठी आहे आणि नेमकी किती सूट मिळेल, हे अर्ज करण्यापूर्वी बँकेत विचारून घ्या. एसबीआयच्या रेग्युलर कार लोनमध्ये मुदतीपूर्वी लोन फेडण्याचे (Foreclosure) नियमही आहेत. त्यामुळे सणासुदीची ऑफर आणि रेग्युलर नियम दोन्ही तपासून मगच निर्णय घ्या.

46
कोटक महिंद्रा बँक – प्रोसेसिंग फीमध्ये ५०% पर्यंत सूट
Image Credit : Asianet News

कोटक महिंद्रा बँक – प्रोसेसिंग फीमध्ये ५०% पर्यंत सूट

कोटक महिंद्रा बँक कार लोनच्या प्रोसेसिंग फीवर ५०% पर्यंत सूट देत आहे. तसेच, मुदतीपूर्वी लोन फेडल्यास कोणतेही फोरक्लोजर चार्जेस (Foreclosure charges) लागणार नाहीत, असंही बँकेने स्पष्ट केलं आहे. जे लोक वेळेआधीच लोन फेडण्याचा विचार करतात, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. पण लक्षात घ्या, ५०% सूट ही फक्त प्रोसेसिंग फीवर आहे, व्याजदरावर नाही. त्यामुळे अटी आणि शर्ती बँकेकडून नीट समजून घ्या.

56
एचडीएफसी बँक – ८.२५% पासून व्याजदर
Image Credit : our own

एचडीएफसी बँक – ८.२५% पासून व्याजदर

एचडीएफसी बँक कार लोनवर वार्षिक ८.२५% पासून व्याजदर आकारत आहे. या बँकेतही मुदतीपूर्वी लोन फेडल्यास अतिरिक्त चार्जेस लागत नाहीत. तसेच, तुम्ही जास्तीत जास्त ८ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी लोन घेऊ शकता. लोनचा कालावधी जास्त असेल तर ईएमआय (EMI) कमी येतो. पण जास्त कालावधीमुळे तुम्हाला एकूण व्याज जास्त भरावं लागतं. त्यामुळे फक्त कमी ईएमआय न पाहता, एकूण किती रक्कम भरावी लागेल याचा हिशोब नक्की करा.

66
कार लोन घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Image Credit : Freepik

कार लोन घेण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

फक्त कमी व्याजदर किंवा प्रोसेसिंग फीमधील सूट पाहून कार लोन घेऊ नका. सर्वात आधी, तुम्हाला नेमक्या कोणत्या दराने लोन मिळत आहे, हे बँकेकडून कन्फर्म करा. त्यानंतर प्रोसेसिंग फी, इतर चार्जेस, ईएमआय, लोनचा कालावधी आणि फोरक्लोजरचे नियम यांची तुलना करा. तुमच्या उत्पन्नानुसार योग्य ईएमआय निवडणं महत्त्वाचं आहे. या चारही बँकांच्या ऑफर्स बदलू शकतात, त्यामुळे अर्ज करतानाचे ताजे नियम नक्की तपासा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Indian Railways : इंडियन रेल्वेचा मोठा निर्णय? RAC तिकीट बंद करण्याच्या तयारीत
Recommended image2
India Auto Sales : ऑक्टोबर 2026 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल विक्रीने मोडले सर्व रेकॉर्ड
Recommended image3
Smart Watches : टायटन ते रियलमी... १० हजारांच्या आत मिळणारी ५ बेस्ट स्मार्टवॉचेस
Recommended image4
Home Loan Management: दीर्घकालीन गृहकर्ज असताना कुटुंबाचे आर्थिक संरक्षण कसे करावे?
Recommended image5
Lightweight Scooters : 70000 ते 90000 रुपयांत मिळणारे 4 हलके आणि कमी उंचीचे स्कूटर्स, मायलेजही 50 किमी
Related Stories
Recommended image1
Used Car Buying Guide : जुनी कार घेताय? मग या 5 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर फसाल
Recommended image2
Diwali Car Offers : दिवाळीत कार खरेदीवर बंपर डिस्काउंट; 4.99 लाखांच्या कारवर भन्नाट ऑफर्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved