भारताच्या ऑटोमोबाइल इतिहासातील आयकॉनिक Tata Sierra आता 2025 मध्ये आधुनिक रूपात पुनरागमन करत आहे. ही नवी SUV जुन्या रग्ड 4x4 मॉडेलपेक्षा डिझाइन, तंत्रज्ञान आणि इंजिन पर्यायांमध्ये (पेट्रोल, डिझेल, EV) पूर्णपणे वेगळी आहे.

भारतातील ऑटोमोबाइल इतिहासात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली Tata Sierra आता एकदम आधुनिक रूपात पुनरागमन करत आहे. 1990 च्या क्लासिक SUV पासून 2025 मधील फ्युचरिस्टिक Sierra पर्यंत डिझाइन, फीचर्स, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्समध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळतो. चला तर पाहूया, जुनी आणि नवी Sierra मध्ये नेमकं काय बदललं आहे?

2025 Sierra Vs 1990 Sierra, काय आहे सगळ्यात मोठा फरक?

आधुनिक पण कमी 'रग्ड' SUV डिझाइन

1990 ची Tata Sierra तिच्या बॉक्सी, मस्कुलर आणि रग्ड SUV स्टाइलिंगसाठी प्रसिद्ध होती. मोठे विंडो ग्लास, उठावदार फेंडर्स आणि चौकोनी हेडलॅम्प्स तिला एक दमदार रोड प्रेझेन्स देत.

नवीन 2025 Sierra मात्र

स्लीक सिल्होएट,

शार्प कॅरेक्टर लाईन्स,

स्लिम LED हेडलॅम्प्स,

मॉडर्न DRLs

अशा फ्युचरिस्टिक डिझाइनमध्ये तयार झाली आहे. ती प्रीमियम दिसते, पण SUVची रग्ड ओळख काही प्रमाणात कमी जाणवते.

4x4 नाही, मोठा मिस

जुन्या Sierra ची ओळख 4x4 ऑफ-रोडिंग क्षमता होती. तथापि, 2025 Sierra मध्ये Tata ने 4-wheel-drive दिलेले नाही, कारण आजचे ग्राहक प्रामुख्याने ऑन-रोड ड्रायव्हिंगला प्राधान्य देतात. ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी हा मोठा ‘मिस’ असला, तरी Tata ने याला लाइफस्टाइल SUV म्हणून अधिक ट्यून केल्याचं स्पष्ट जाणवतं.

इंजिन आणि परफॉर्मन्स, आता EVसह तीन पॉवरट्रेन!

जुनी Sierra:

2.0L डिझेल इंजिन

नंतर टर्बो डिझेल

5-स्पीड मॅन्युअल

4x4 ऑप्शन

नवी 2025 Sierra:

1.5L NA पेट्रोल

1.5L टर्बो पेट्रोल

1.5L डिझेल

हारिअर EV-आधारित इलेक्ट्रिक पॉवरट्रेन

ICE व्हेरियंटमध्ये मॅन्युअल + ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. यामुळे Sierra आता फक्त डिझेल SUV नसून, एक फुल-लाइनअप लाइफस्टाइल SUV बनते.

इंटिरियर, मिनिमलपासून फ्युचरिस्टिक लक्झरीपर्यंत

जुनी Sierra होती पूर्णपणे साधी आणि मिनिमल,

बेसिक अॅनालॉग डायल्स

साधे फिजिकल कंट्रोल

2025 मॉडलमध्ये मात्र मोठा टेक-लीप दिसतो

ड्युअल-स्क्रीन इन्फोटेनमेंट

व्हेंटिलेटेड सीट्स

मोठं पॅनोरॅमिक सनरूफ

अॅम्बियंट लाइटिंग

प्रीमियम ऑडिओ सिस्टीम

ADAS, मल्टी एअरबॅग, ABS, हिल-होल्ड

आतून ही SUV आता पूर्णपणे फ्युचरिस्टिक दिसते.

तीन-दारांऐवजी आता प्रॅक्टिकल पाच दारे

1990 Sierra चे सर्वात वेगळेपण म्हणजे 3-door लेआउट

फक्त 2 फ्रंट दारे

मागे बसण्यासाठी फ्रंट सीट फोल्ड करावी लागत असे

नवीन Sierra मात्र अधिक प्रॅक्टिकल 5-door डिझाईनमध्ये येते आणि त्याचबरोबर तिची सिग्नेचर कर्व्ड रियर ग्लास डिझाइन जपते.

मागे लावलेलं बाहेरचं स्पेअर व्हील मात्र नवीन आवृत्तीत नाही.

जुनी ओळख + नवा लाइफस्टाइल SUV कॉम्बो

Tata Sierra 2025 ही क्लासिक Sierra ची थेट प्रतिकृती नसून, तिच्या भावनांना आधुनिक SUVमध्ये रूपांतरित करणारी नवी पिढी आहे. रग्डपणा थोडा कमी झाला असला तरी, ती आता अधिक प्रीमियम, अधिक टेक-सॅव्ही आणि अधिक प्रॅक्टिकल बनली आहे.