How To Select The Right Car : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि कोणती निवडावी याबद्दल गोंधळात आहात? तुमचे बजेट, प्रवासाच्या गरजा, कुटुंबाचा आकार आणि ड्रायव्हिंगची पद्धत लक्षात घेऊन तुमच्यासाठी सर्वोत्तम कार सेगमेंट कोणता आहे ते शोधा.

How To Select The Right Car : नवीन कार खरेदी करण्याची योजना आखताना अनेकजण गोंधळून जातात. अनेकदा लोक कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा शेजारी यांच्याकडे असलेली कार खरेदी करतात. पण नंतर त्यांना कळतं की त्यांना वेगळ्या प्रकारची कार हवी होती. तुम्हीही याच समस्येचा सामना करत आहात का? तर मग काही गोष्टी समजून घेतल्यास तुमच्या जीवनशैली आणि गरजांसाठी सर्वात योग्य कार सेगमेंट कोणता आहे हे ठरवणं सोपं होईल. या गोष्टी सविस्तरपणे पाहूया. वाहनांना हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही अशा प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारचे हे तीन विभाग आहेत.

जागा आणि आराम : कशाला जास्त महत्त्व द्यायचे?

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नियमितपणे लांबच्या प्रवासाला जात असाल आणि आरामाला प्राधान्य देत असाल, तर सेडान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. सेडानमध्ये चांगली जागा, मागच्या सीटवर उत्तम आराम आणि प्रवासाचा सहज अनुभव मिळतो. शहरी वापरासाठी हॅचबॅक उत्तम आहेत, पण पाच जणांसोबत लांबच्या प्रवासासाठी त्या थोड्या गैरसोयीच्या ठरू शकतात. अशा परिस्थितीत, सेडान एक चांगला समतोल साधतात. जर तुम्हाला जास्त बसण्याची जागा, उंच आसनव्यवस्था आणि मोठी स्टोरेज स्पेस हवी असेल, तर एसयूव्ही हा सर्वोत्तम पर्याय आहे.

बजेट

तुमचे बजेट सहा लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, तर हॅचबॅक आणि सेडान हे चांगले पर्याय आहेत. तथापि, तुमचे बजेट थोडे वाढवून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये गेल्यास तुम्हाला उत्तम फीचर्स, मोठी केबिन आणि रस्त्यावर अधिक प्रभावी उपस्थिती मिळते. एसयूव्हीमध्ये जास्त ग्राउंड क्लिअरन्स देखील असतो, जो खराब रस्त्यांवर खूप उपयुक्त ठरतो.

फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान

नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, मोठी टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि ADAS सह अनेक प्रगत सुरक्षा फीचर्स मिळतात. त्याच वेळी, सेडानमध्येही चांगले फीचर्स मिळतात. पण हॅचबॅकमध्ये, विशेषतः बजेट मॉडेल्समध्ये, फीचर्स मर्यादित असू शकतात.

ड्रायव्हिंगची पद्धत आणि वापर

जर तुम्ही बहुतेक वेळा कमी पार्किंग असलेल्या शहरात गाडी चालवत असाल, तर हॅचबॅक हे सर्वात सोयीस्कर आणि व्यावहारिक वाहन आहे. हायवे आणि लांबच्या प्रवासासाठी सेडान योग्य आहे. तर, खराब, खडबडीत किंवा डोंगराळ अशा सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून प्रवास करायचा असेल, तर एसयूव्ही हा सर्वोत्तम पर्याय आहे.