साखरपुड्यासाठी लेटेस्ट मेहंदी डिझाइन शोधताय? मग 2026 चे हे ट्रेंडी, सोपे आणि सुंदर पॅटर्न नक्की पाहा. या डिझाइन्समुळे तुमचे हात अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतील.

Trendy Engagement Mehndi Designs Photo: लवकरच साखरपुडा ठरलाय? ड्रेस फायनल झालाय, मेकअपसाठी पार्लरही बुक झालंय, पण अजून तुमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मेहंदीची डिझाइन निवडली नाहीये? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. इथे आम्ही 2026 च्या काही नवीन, युनिक आणि सिंपल मेहंदी डिझाइन्स देत आहोत, ज्या पूर्ण हात न भरताही खूप आकर्षक दिसतात.

1. ब्रायडल बेल मेहंदी डिझाइन (Bridal Mehndi Latest)

साखरपुड्याला लेहेंगा किंवा गाऊन घालणार असाल, तर ही स्टायलिश आणि 'निगेटिव्ह स्पेस' असलेली बेल मेहंदी निवडा. हाताच्या मागच्या बाजूला ही वेल काढली जाते. मोठी फुलं आणि नाजूक कळ्यांमुळे ती आणखी सुंदर दिसते. बोटांवर छोट्या-छोट्या वर्तुळांची नाजूक डिझाइन काढल्यामुळे हात लांब दिसतात. यावर कॉन्ट्रास्ट नेलपॉलिश आणि वजनदार बांगड्या घातल्या की लूक एकदम परफेक्ट दिसेल.

2. मंडला आर्ट मेहंदी डिझाइन (Hand Mehndi Designs Mandala Art)

मॉडर्न नवरी असाल आणि हातांना क्लासिक पण भरगच्च लूक हवा असेल, तर मंडला आर्ट मेहंदी नक्की ट्राय करा. तळहाताच्या मध्यभागी एक मोठं वर्तुळ काढून त्यात जाळी वर्क केल्यास पारंपरिक लूक मिळतो. यावर खडे किंवा मोती लावून तुम्ही या डिझाइनला आणखी युनिक बनवू शकता.

3. पीकॉक मोटिफ मेहंदी (Mehndi Designs Front Hand)

मोराच्या पिसाऱ्यासारखी ही डिझाइन तिच्या बारीक कलाकुसरीसाठी आणि भौमितिक पॅटर्नसाठी ओळखली जाते. सोबतच चेक्सची डिझाइन तिला आणखी खास बनवते. तुम्ही ही डिझाइन तळहातावर आणि हाताच्या मागच्या बाजूलाही काढू शकता.

4. सिंपल मेहंदी डिझाइन (Simple New Mehandi)

हाताच्या मागच्या बाजूला मंडला आर्टपासून प्रेरित ही डिझाइन खूप आकर्षक आणि क्लीन लूक देते. हाताच्या मधोमध एक सुंदर वर्तुळ काढून ते मोत्यांनी सजवलं जातं. मनगटावर काढलेली रुंद पट्टी आणि जाळी वर्कमुळे लूक बॅलन्स होतो. तुम्हीही तुमच्या खास दिवशी ही डिझाइन ट्राय करू शकता.

5. अरेबिक मेहंदी पॅटर्न (Arabic Mehndi Pattern)

फॅशन आणि परंपरेचं कॉम्बिनेशन असलेली ही मेहंदी डिझाइन मॉडर्न आहे. यामुळे हाताचे कर्व्ह्स अधिक उठून दिसतात. मनगटापासून अंगठ्यापर्यंत 'S' आकाराची वेल काढली जाते. शेडिंगमुळे या डिझाइनला एक वेगळाच लूक येतो. तुम्हाला जर ग्रेसफुल ब्राइडल लूक हवा असेल, तर ही डिझाइन नक्की निवडा.

6. रोज मेहंदी डिझाइन (Rose Mehndi New Photo Design)

सध्या गुलाबाच्या पाकळ्यांची मेहंदी खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हीही साखरपुड्यासाठी ही डिझाइन निवडू शकता. हाताच्या मध्यभागी एक मोठं गुलाबाचं फूल काढून त्याच्या आजूबाजूला बारीक ठिपके आणि पानांच्या कळ्या काढल्या जातात. कडेला काढलेली बारीक जाळी मॉडर्न आणि कॉन्ट्रास्ट लूक देते. लांब पानांची वेल बोटांना 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' बनवते.

7. पाकिस्तानी ब्रायडल मेहंदी (Bridal Mehndi 2026)

गोऱ्या हातांवर पाकिस्तानी ब्रायडल मेहंदी खूपच छान दिसेल. ही मेहंदी गडद रंगाची आणि शेडिंगवाली असल्याने हातांना बोल्ड लूक मिळतो. यामध्ये हाताच्या मध्यभागी दाट मंडला डिझाइन आणि मनगटावर बांगडीसारखा रुंद बँड काढला जातो, जो खूप भरगच्च आणि शाही दिसतो.

8. मिनिमलिस्टिक मेहंदी (Minimal Mehndi For Brides)

आजकालच्या मॉडर्न नवरींना मिनिमल मेहंदी खूप आवडतेय. ही डिझाइन सिंपल असूनही एलिगंट लूक देते. तळहात पूर्णपणे रिकामा ठेवून फक्त मध्यभागी सूर्यफुलाचं मोटिफ काढलं जातं. बोटांवर गडद रंगाची मेहंदी काढल्यामुळे ती नाजूक दिसते.

9. इंडो-वेस्टर्न मेहंदी (Indo Western Geometric Mehndi)

नेहमीच्या फुल-पानांच्या डिझाइनपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल, तर ही मॉडर्न इंडो-वेस्टर्न भौमितिक मेहंदी ट्राय करा. यात तळहातावर षटकोनी आकार (Hexagon Shape) काढून आतमध्ये फुलं काढली जातात. तर बारीक रेषा आणि ठिपके मनगटाचं सौंदर्य वाढवतात. या डिझाइनमुळे हातांना 'हाथफूल' घातल्यासारखा लूक येतो.

10. ज्वेलरी मेहंदी (Jewellery Mehndi Pics)

ही डिझाइन खूपच क्रिएटिव्ह आणि हटके आहे. सहसा मंडला डिझाइन गोलाकार असते, पण यामध्ये त्रिकोणी आकारात (Triangle Shape) डिझाइन काढली जाते. बोटांवर काढलेली चेन आणि ठिपक्यांची डिझाइन क्लासी लूक देते.