भारत आणि श्रीलंका दरम्यान होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. T20I साठी भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.
टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय, राहुल द्रविडला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीचा मार्गदर्शक म्हणून त्याच्या जागी संपर्क साधण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हा सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
T20 विश्वचषक चॅम्पियन भारताच्या विजेत्या संघाचे सदस्य, कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक यांनी शुक्रवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुफद्दल वोहरा नावाच्या हँडलवर भारतीय संघाच्या विजय परेडचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि संपूर्ण भारतीय संघ वानखेडे स्टेडियममध्ये हातात ट्रॉफी घेऊन फिरताना दिसत आहे
Team India Victory Parade in Mumbai : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या घोषणा देण्यात येत आहेत.
Team India Victory Parade in Mumbai : ढोल ताशाच्या गजरात टीम इंडियाच्या जल्लोषासाठी वानखेडे स्टेडिअमवर खचून गर्दी पाहायला मिळत आहे.
T20 World Cup 2024 : वानखेडे स्टेडियमवर चाहते 'मुंबई चा राजा रोहित शर्मा' आणि 'इंडियाचा राजा रोहित शर्मा'च्या घोषणा देत आहेत. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत चाहत्यांची गर्दी झाली आहे.
T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली. त्यांनी विश्वचषक ट्रॉफीसोबत फोटोसाठी पोझ दिली. यादरम्यान त्यांनी असे काम केले की सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.