Virender Sehwag Wife And BCCI President Mithun Manhas Dating Rumors: बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत यांच्यातील डेटिंगच्या चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
Virender Sehwag Wife And BCCI President Mithun Manhas Dating Rumors : सोशल मीडियावर सध्या माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी सेहवाग आणि आरतीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, वीरेंद्र आणि आरती काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
मिथुन मन्हास वीरेंद्र सेहवागचे जुने मित्र
मिथुन मन्हास हे वीरेंद्र सेहवागचे जुने मित्र असून नुकतेच ते बीसीसीआयचे नवे अध्यक्ष झाले आहेत. यानंतर त्यांचे नाव आता आरती अहलावतसोबत जोडले जात आहे. 2025 मध्ये रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या अफवेने जोर तेव्हा धरला जेव्हा पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये 2009 च्या वादाचा उल्लेख केला, ज्यात क्रिकेटपटू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश होता. अभिषेकची पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि त्यावर लाखो व्ह्यूज आले.
जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या चर्चांना आणखी खतपाणी तेव्हा मिळालं, जेव्हा वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांची दोन्ही मुले सोशल मीडियावर मिथुन मन्हासला फॉलो करत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. याशिवाय, 2021 मधील एक जुना फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यात आरती आणि मिथुन मन्हास एकत्र दिसत आहेत. या फोटोमुळे लोकांचा संशय आणखी वाढला आहे. मात्र, अद्याप सेहवाग, आरती किंवा मिथुन मन्हास यांच्यापैकी कोणीही या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत निवेदन दिलेले नाही. सध्या या अफवांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
