Vaibhav Suryavanshi Smashes Explosive Century : U19 आशिया कप एकदिवसीय स्पर्धेत UAE विरुद्ध भारताच्या वैभव सूर्यवंशीने स्फोटक शतक झळकावले. ५६ चेंडूत शतक पूर्ण करणाऱ्या वैभवला ॲरॉन जॉर्जने अर्धशतक झळकावून उत्तम साथ दिली.
Vaibhav Suryavanshi Smashes Explosive Century : U19 आशिया कप एकदिवसीय स्पर्धेत UAE विरुद्ध भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने स्फोटक शतक झळकावले आहे. ५६ चेंडूत शतक पूर्ण करणाऱ्या वैभवच्या आणि अर्धशतक करणाऱ्या ॲरॉन जॉर्जच्या फलंदाजीच्या जोरावर, UAE विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने २५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात २०४ धावा केल्या आहेत.
वैभव ७२ चेंडूत १३० धावांवर आणि ॲरॉन जॉर्ज ६७ चेंडूत ६४ धावांवर खेळत आहेत. भारताने फक्त कर्णधार आयुष म्हात्रेची विकेट गमावली आहे, ज्याने चार धावा केल्या. वैभवने आतापर्यंत १२ षटकार आणि पाच चौकार मारले आहेत. कोट्टायमचा रहिवासी असलेल्या ॲरॉन जॉर्जने ५७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

नाणेफेक हारून फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला तिसऱ्याच षटकात कर्णधार आयुष म्हात्रेची विकेट गमवावी लागली. पण दुसऱ्या विकेटसाठी एकत्र आलेल्या वैभव आणि ॲरॉन जॉर्जने १३३ चेंडूत १९६ धावांची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले.
भारतीय प्लेइंग इलेव्हन: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, ॲरॉन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, कनिष्क चौहान.
UAE प्लेइंग इलेव्हन: यायिन राय (कर्णधार), अयान मिस्बा, अहमद खुदाद, शालोम डिसूझा, पृथ्वी मधु, नुरुल्ला अयोबी, सालिह अमीन (विकेटकीपर), उद्दिश सुरी, अली असगर शम्स, युग शर्मा, मोहम्मद रयान खान.


