South Africa Squad For T20 World Cup 2026 Announced : आगामी आयसीसी T20 विश्वचषकासाठी एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
South Africa Squad For T20 World Cup 2026 Announced : आगामी 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा मजबूत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून, एडन मार्करमला कर्णधार बनवण्यात आले आहे. नुकताच निवृत्ती मागे घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने संघात स्थान मिळवले आहे. तसेच, दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया देखील संघात परतला आहे.
संघात कर्णधार एडन मार्करम व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक, टोनी डी जॉर्जी, डेवाल्ड ब्रेविस, जेसन स्मिथ, डेव्हिड मिलर आणि डोनोव्हन फरेरा यांचा समावेश असलेली मजबूत फलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. कागिसो रबाडा, क्वेना मफाका, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी आणि कॉर्बिन बॉश यांचा समावेश असलेला वेगवान गोलंदाजीचा ताफाही मजबूत आहे. फिरकी विभागाचे नेतृत्व केशव महाराज करतील. त्यांना जॉर्ज लिंडे, एडन मार्करम आणि डोनोव्हन फरेरा साथ देतील.
दक्षिण आफ्रिकेचा संघ 'डी' गटात असून, याच गटात अफगाणिस्तान, न्यूझीलंड, कॅनडा आणि यूएई या संघांचा समावेश आहे.
मागील वेळी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव
मागील आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या रोमहर्षक पराभवामुळे त्यांना पुन्हा एकदा 'चोकर्स' म्हटले गेले. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला अद्याप आयसीसी T20 विश्वचषक जिंकता आलेला नाही.
आयसीसी T20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
एडन मार्करम (कर्णधार), डेव्हिड मिलर, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जॉर्जी, जेसन स्मिथ, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, क्वेना मफाका.


