Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Postponed : भारतीय क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, स्मृतीच्या वडिलांना आजारपणामुळे सांगलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Postponed : भारतीय क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. हा समारंभ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी सांगलीत होणार होता. मानधनाच्या व्यवस्थापकानुसार, क्रिकेटपटूने स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तिला लग्न करायचे नाही.

स्मृतीचे वडील डॉक्टरांच्या देखरेखीखाली

मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, “स्मृती मानधना यांच्या वडिलांची प्रकृती रविवार सकाळपासूनच ठीक नव्हती. त्यांना सांगलीतील एका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि अनेक चाचण्या केल्या जात आहेत. स्मृतीने वडिलांच्या आजारपणात लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.” लग्न कधी होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

नाश्ता करताना अचानक प्रकृती बिघडली

स्मृतीच्या व्यवस्थापकाने सांगितले, “श्री. श्रीनिवास मानधना आज सकाळी नाश्ता करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. आम्ही थोडा वेळ थांबलो. आम्हाला वाटले की हे सामान्य असेल, ते बरे होतील. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडत होती. त्यामुळे आम्ही कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेले. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांना अजून काही काळ रुग्णालयात राहावे लागेल.

लग्नापूर्वी वधू vs वर संघात सामना

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल रविवार, २३ नोव्हेंबर रोजी एका खाजगी समारंभात लग्न करणार होते. गेल्या काही दिवसांपासून मेहंदी, हळदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक विधी सुरू होते. यात एक मजेशीर ट्विस्ट देत, या जोडप्याने वधू संघ विरुद्ध वर संघ असा एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामनाही आयोजित केला होता. स्मृतीच्या अनेक संघ सहकारी, ज्यात जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, शेफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि ऋचा घोष यांचा समावेश होता, या प्रसंगी उपस्थित होत्या. हळदी समारंभादरम्यान मानधनाचा तिच्या संघ सहकाऱ्यांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यात सेलिब्रेशनची मजा स्पष्ट दिसत होती.