IND vs NZ Final Match Update: टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची तुफानी खेळी करत टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. यासोबतच, टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग तीन अर्धशतकं करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
IND vs NZ Final Match Update: टी-20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये संजू सॅमसनने 89 धावांची धडाकेबाज खेळी करत टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांमध्येही त्याने अर्धशतकं झळकावली होती. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा संजू सॅमसन हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
संजूपेक्षा आधी फक्त दोघांनीच केलाय हा पराक्रम
संजू सॅमसनच्या आधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग 3 अर्धशतकं करण्याचा पराक्रम भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी केला आहे. फायनल मॅचमध्ये संजूने 46 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार लगावले.
Scroll to load tweet…
स्पर्धेत टीम इंडियाचे 100 पेक्षा जास्त षटकार
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या स्पर्धेत टीम इंडियाने 100 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. यामध्ये सर्वाधिक षटकार हे संजू सॅमसनच्या नावावर आहेत.


