भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर सहभागी होणार नाहीत. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष निवडला जाणार आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण होणार म्हणून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी हे पदावरून पायउतार झाल्यानंतर आता कोणाला अध्यक्ष केलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे. सचिन तेंडुलकर आता नवीन अध्यक्ष होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं, पण तो खात्रीलायकरीत्या अध्यक्ष होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
सचिनने काय सांगितलं?
सचिन तेंडुलकर याने आपण भारतीय क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष म्हणून शर्यतीत भाग घेणार नसल्याची माहिती त्यानं जवळच्या नातेवाईकांना दिली आहे. २८ सपटंबरला भारतीय क्रिकेट मंडळाची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मंडळाचा अध्यक्ष आणि बैठकीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.
रॉजर बिन्नी यांच्यानंतर कोण होणार अध्यक्ष?
माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांच्यानंतर माजी खेळाडूच अध्यक्ष म्हणून निवडला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळं सचिन तेंडुलकरचे नाव माध्यमांमध्ये चर्चेत यायला सुरुवात झाली. सध्याच्या घडीला सचिनला वेळ देणं शक्य नसल्यामुळं तो बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम करण्यास इच्छुक नसल्याचं दिसून आलं आहे.
व्यावसायीक कामात सचिन व्यस्त
व्यावसायिक कामात सचिन व्यस्त असल्यामुळं बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी वेळ देणं त्याला शक्य होणार नाही. बीसीआयच्या अध्यक्षपदासाठी खासकरून माजी खेळाडूंचे नाव घेतले जात आहे. पण या अध्यक्षपदाच्या शर्यतीत खासकरून राज्य क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपैकी काहीजण उत्सुक असून ते शर्यतीत सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
