- Home
- Sports
- Cricket
- RCB खरेदीसाठी पुनावालानंतर आता अदानींची बोली, 6 कंपन्यांनी दाखवला रस, 17600 कोटींना सौदा होणार?
RCB खरेदीसाठी पुनावालानंतर आता अदानींची बोली, 6 कंपन्यांनी दाखवला रस, 17600 कोटींना सौदा होणार?
RCB Team Sale Adani Group and Poonawalla : आयपीएल 2026 पूर्वी आरसीबी (RCB) फ्रँचायझी विकली जाण्याची शक्यता आहे. सध्याची मालक कंपनी डियाजिओ (Diageo) हा संघ विकणार असून, आदर पूनावाला, जेएसडब्ल्यू (JSW) आणि अदानी ग्रुपसह 6 कंपन्यांनी रस दाखवला आहे.

आयपीएल 2026 पूर्वी आरसीबी विकणार?
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. या स्पर्धेपूर्वी आरसीबीने आपली फ्रँचायझी विकायला काढली आहे. काही कंपन्यांनी संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
आरसीबीला मिळणार नवीन मालक?
त्यामुळे, पुढच्या मोसमात आरसीबी संघाला नवीन मालक मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. या शर्यतीत कोणत्या कंपन्या आहेत, याची माहिती येथे दिली आहे.
17,587 कोटी रुपयांचा संघ
विद्यमान चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी नवीन मालकाच्या शोधात आहे. या फ्रँचायझीचे मूल्य अंदाजे 17,587 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
मालक कंपनी डियाजिओमध्ये मतभेद
डियाजिओ कंपनीने आपला आरसीबी संघ विकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पण, डियाजिओ इंडिया विभागाने या निर्णयाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.
अदानी आणि पूनावाला शर्यतीत
क्रिकबझच्या वृत्तानुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी फ्रँचायझी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुप आणि अदानी ग्रुपही उत्सुक आहेत.
अदानी ग्रुप आयपीएलमध्ये येणार?
आयपीएलमध्ये अदानी ग्रुपला असलेला रस सर्वांनाच माहीत आहे. 2022 मध्ये त्यांना संघ खरेदी करता आला नव्हता. दुसरीकडे, जिंदाल ग्रुपची दिल्ली कॅपिटल्समध्ये भागीदारी आहे.
आरसीबीच्या विक्रीचा करार होणार?
विक्रीबाबत सल्ला देण्यासाठी डियाजिओने दोन खासगी बँकांची नियुक्ती केल्याचे म्हटले जात आहे. हा करार पूर्ण होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

