MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • IPL 2026 : आयपीएल सुरू होण्याआधीच RCB ला मोठा धक्का, 2 स्टार गोलंदाज पहिल्या मॅचमधून बाहेर

IPL 2026 : आयपीएल सुरू होण्याआधीच RCB ला मोठा धक्का, 2 स्टार गोलंदाज पहिल्या मॅचमधून बाहेर

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या सीजनला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच मॅचमध्ये RCB चा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. पण या मोठ्या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 28 2026, 11:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
19व्या सीजनच्या IPL ची उलटी गिनती सुरू
Image Credit : Pinterest

19व्या सीजनच्या IPL ची उलटी गिनती सुरू

IPL 2026 चा फिव्हर चढायला काही तास शिल्लक आहेत. पण गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला सीजनच्या पहिल्याच मॅचआधी मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या ओपनिंग मॅचपूर्वी टीमचं बॉलिंग डिपार्टमेंट अडचणीत आलंय. दोन महत्त्वाचे फास्ट बॉलर्स बाहेर झाल्यानं कॅप्टन रजत पाटीदारचं टेन्शन वाढलं आहे.
26
जोश हेजलवुड सामन्यापूर्वी बाहेर
Image Credit : Getty

जोश हेजलवुड सामन्यापूर्वी बाहेर

RCB च्या बॉलिंग अटॅकचा सर्वात मोठा हुकमी एक्का म्हणजे जोश हेझलवूड. हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी स्पष्ट केलंय की हा ऑस्ट्रेलियन पेसर टीममध्ये दाखल झाला आहे, पण तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध नसेल. एम. चिन्नास्वामी स्टेडियमसारख्या बॅटिंग फ्रेंडली पिचवर त्याची अनुपस्थिती RCB साठी मोठं नुकसान आहे. तो लवकरच टीममध्ये परतावा अशी मॅनेजमेंटची इच्छा असेल.

Related Articles

Related image1
Corporate Looks: IPL टीमच्या मालकिणीसारखा थाट हवाय? अनन्या बिर्लाचे हे 7 कॉर्पोरेट सूट्स देतील 'बॉस लेडी' लूक
Related image2
IPL 2026 साठी BCCI चे कडक नियम जाहीर; सामन्याच्या दिवशी सरावास बंदी, खेळाडूंवर नवे निर्बंध
36
नुवान तुषाराला अद्याप NOC मिळालेली नाही
Image Credit : Getty

नुवान तुषाराला अद्याप NOC मिळालेली नाही

हेझलवूडच्या अनुपस्थितीत RCB ने श्रीलंकेचा पेसर नुवान तुषारावर आशा ठेवल्या होत्या, पण तिथेही निराशाच पदरी पडली. तुषारा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आहे. इतकंच नाही, तर त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) सुद्धा मिळालेलं नाही. त्यामुळे तोही सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या मॅचमधून बाहेर झाला आहे.
46
जेकब डफी करणार IPL मध्ये डेब्यू?
Image Credit : ANI

जेकब डफी करणार IPL मध्ये डेब्यू?

दोन स्टार बॉलर्स बाहेर गेल्यानं न्यूझीलंडचा पेसर जेक डफीच्या IPL डेब्यूची शक्यता वाढली आहे. डफीनं आतापर्यंत एकही IPL मॅच खेळलेली नाही. त्याच्यासोबत मध्य प्रदेशचा तरुण पेसर मंगेश यादवलाही प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते. RCB ने मंगेशला मिनी ऑक्शनमध्ये 5.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मंगेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पाटीदारच्या कॅप्टन्सीखाली शानदार कामगिरी केली होती.
56
रजत पाटीदारसमोरील मोठे आव्हान
Image Credit : ANI

रजत पाटीदारसमोरील मोठे आव्हान

गतविजेत्या RCB चा कॅप्टन म्हणून रजत पाटीदारसाठी हे पहिलंच मोठं आव्हान आहे. टीममध्ये विराट कोहली आणि फिल सॉल्टसारखे स्टार बॅट्समन आहेत, पण तो अननुभवी बॉलर्ससोबत सनरायझर्ससारख्या मजबूत टीमचा सामना कसा करतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. SRH कडे ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेनसारखे स्फोटक बॅट्समन आहेत, जे RCB च्या बॉलर्ससाठी मोठी परीक्षा ठरतील.
66
दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू
Image Credit : Getty

दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेक डफी, मंगेश यादव.इम्पॅक्ट प्लेअर: सुयश शर्मासनरायझर्स हैदराबाद: ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन, इशान किशन, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिव्हिंगस्टोन, कमिंदु मेंडिस, ब्रायडन कार्स, हर्षल पटेल, झीशान अन्सारी.इम्पॅक्ट प्लेअर: शिवम मावी

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
आयपीएल
Recommended Stories
Recommended image1
वैभव सूर्यवंशी भारतीय संघातून लवकरच खेळणार, १५ वर्षांचा झाला बेबी हल्क
Recommended image2
IPL 2026 साठी BCCI चे कडक नियम जाहीर; सामन्याच्या दिवशी सरावास बंदी, खेळाडूंवर नवे निर्बंध
Recommended image3
IPL मधील मोठा धमाका! 'ही' दिग्गज टीम तब्बल १५,००० कोटींना विकली; मुकेश अंबानींनाही दिली तगडी टक्कर!
Recommended image4
RCB फॅनची जादू पाहून जेकब बेथेलही थक्क! आयपीएलच्या मैदानात रंगला अनोखा 'मॅजिक शो'
Recommended image5
Dinesh Karthik : दिनेश कार्तिक पुन्हा एकदा बाबा; सोशल मीडियावर दिली खुशखबर
Related Stories
Recommended image1
Corporate Looks: IPL टीमच्या मालकिणीसारखा थाट हवाय? अनन्या बिर्लाचे हे 7 कॉर्पोरेट सूट्स देतील 'बॉस लेडी' लूक
Recommended image2
IPL 2026 साठी BCCI चे कडक नियम जाहीर; सामन्याच्या दिवशी सरावास बंदी, खेळाडूंवर नवे निर्बंध
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved