IPL 2026, LSG vs DC: समीर रिझवीच्या तुफानी खेळीमुळे दिल्लीने लखनऊवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. त्याच्या आक्रमक फलंदाजीने मॅचचं चित्रच पालटलं आणि दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

समीर रिझवीने जबरदस्त स्टाईलमध्ये मॅच संपवली आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने अब्दुल समदच्या बॉलवर खणखणीत सिक्सर मारून सामना संपवला. रिझवीच्या या दमदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने १७.१ ओव्हरमध्ये १४५/४ धावा करत हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला. याआधी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ १८.४ ओव्हरमध्ये १४१ धावांवर ऑलआऊट झाला होता.

लखनऊ सुपर जायंट्सचा डाव १४१ धावांवर गडगडला. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने सलग दोन विकेट्स घेऊन लखनऊच्या उरल्यासुरल्या आशाही संपवल्या. आधी एनरिक नॉर्खियाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल थेट लाँग-ऑफला उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात गेला. त्यानंतर मोहसिन खानही जास्त वेळ टिकू शकला नाही आणि शॉर्ट थर्ड मॅनवर कॅच देऊन बसला. अशाप्रकारे लखनऊचा संपूर्ण संघ १४१ धावांवर ऑलआऊट झाला. आता मॅचमध्ये टिकून राहण्यासाठी लखनऊच्या गोलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागणार होती.

आयपीएल २०२६ चा थरार आता चांगलाच रंगात आला आहे. स्पर्धेतील ५ वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होत असून, दोन्ही संघ विजयाने आपल्या अभियानाची सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.

या सामन्यात सर्वात जास्त चर्चा कॅप्टन्सीची आहे. लखनऊ सुपर जायंट्सची धुरा युवा विकेटकीपर-बॅट्समन ऋषभ पंतच्या हातात आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व ऑलराऊंडर अक्षर पटेल करत आहे. त्यामुळे चाहत्यांना मैदानावर रणनीती आणि आक्रमक क्रिकेट दोन्ही बघायला मिळण्याची अपेक्षा आहे.

इकाना स्टेडियमवर मोठा सामना

हा सामना इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या सुरुवातीच्या सामन्यांपैकी एक आहे आणि दोन्ही संघ विजयाने आपल्या सीजनची सुरुवात करू इच्छितात. लखनऊच्या घरच्या मैदानावर, म्हणजेच इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना प्रेक्षकांसाठी खास मानला जात आहे, कारण इथली खेळपट्टी सहसा गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही संधी देते.

हेड-टू-हेडमध्ये कांटे की टक्कर

जर दोन्ही संघांच्या मागील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर सामना खूपच बरोबरीचा राहिला आहे. आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात ७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी:

  • दिल्ली कॅपिटल्सने ४ सामने जिंकले
  • लखनऊ सुपर जायंट्सने ३ सामने जिंकले

या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, दोन्ही संघांमधील लढत नेहमीच चुरशीची आणि रोमांचक होते.

कुणाचं पारडं जड?

दोन्ही संघांकडे मजबूत बॅटिंग आणि बॉलिंग लाईनअप आहे. लखनऊला त्यांच्या घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो, तर दुसरीकडे दिल्लीचा संघ अनुभवी खेळाडूंच्या जोरावर कोणत्याही सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता ठेवतो. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ आपल्या होम ग्राऊंडवर वर्चस्व गाजवते की अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्स विजयाने स्पर्धेची सुरुवात करते, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून होतं.