- Home
- Sports
- Cricket
- Cricketer Rishabh Pant : पंतचा अपघातानंतरचा पहिला प्रश्न, ''मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन का?''
Cricketer Rishabh Pant : पंतचा अपघातानंतरचा पहिला प्रश्न, ''मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन का?''
मुंबई - २०२२ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून आश्चर्यकारकपणे वाचलेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याने अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांना विचारलेला पहिला प्रश्न आता समोर आला आहे. यावरुन त्याचे क्रिकेटवर असलेला प्रेम दिसून येते. जाणून घ्या…
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
पंतने विचारला प्रश्न
अपघातानंतर क्रिकेटर ऋषभ पंतने विचारलेला पहिला प्रश्न क्रिकेटशी संबंधित होता. त्याचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. क्रिकेट हेच त्याचे जीवन आहे. त्यामुळे त्याने इतर काहीही न विचारला केवळ क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारला होता.
भीषण कार अपघात
डिसेंबर २०२२ मध्ये पंतचा भीषण कार अपघात झाला होता. त्यात त्याची कार जवळपास चक्काचूर झाली होती. सुदैवाने तो या अपघातातून सहीसलामात बचावला होता. अन्यथा त्याच्या जीवावरही बेतले असते.
त्याला चालणेही अपघड झाले होते
पंतच्या अपघातातून वाचणे हा एक चमत्कार होता. अपघातानंतर त्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. त्याला चालणेही अपघड झाले होते. प्रत्येक पाऊल टाकताना त्याचे मनोधैर्य कोसळत होते. तरीही तो धडपडत उभा राहत होता. एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करत होता.
अवस्था बेडवर झोपलेल्या रुग्णासारखी
यावेळी त्याची अवस्था बेडवर झोपलेल्या रुग्णासारखी झाली होती. साधी हालचालही करणे त्याला अवघड होते. तरीही त्याला क्रिकेटचे वेध लागले होते. त्यामुळे तो सातत्याने क्रिकेट खेळता येईल की नाही हे डॉक्टरांना विचारत होता. पण त्यांच्याकडेही समाधानकारक उत्तर नव्हते.
फॉर्ममध्ये असताना अपघात
पंतने इंग्लंड दौऱ्यात शतक झळकावले होते. त्यानंतर त्याचा अपघात झाला होता. फॉर्ममध्ये असताना अपघात झाल्याने त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते.