- Home
- Sports
- Cricket
- Team India : एका झटक्यात ८ खेळाडू संघाबाहेर, बुमराहची एन्ट्री; अफगाणिस्तान सिरीजसाठी टीमची घोषणा
Team India : एका झटक्यात ८ खेळाडू संघाबाहेर, बुमराहची एन्ट्री; अफगाणिस्तान सिरीजसाठी टीमची घोषणा
BCCI ने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या ८ खेळाडूंना संघातून वगळण्यात आलंय. तर, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन झालं आहे.
15

Image Credit : X/BCCI
झिम्बाब्वे टूर
झिम्बाब्वे दौऱ्यात खेळलेल्या तब्बल ८ खेळाडूंना अफगाणिस्तान मालिकेसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अनुभवी आणि दुखापतीतून सावरलेले खेळाडू परतले आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : X/BCCI
जसप्रीत बुमराहची एन्ट्री
वेगवान गोलंदाज मयंक यादवला झिम्बाब्वेमध्ये चांगली कामगिरी करूनही वगळण्यात आले. तर, दुखापतीतून सावरलेला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीसारखे खेळाडू संघात परतले आहेत.
35
Image Credit : Getty
कोणाला संघातून काढले?
अफगाणिस्तान मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी: प्रभसिमरन सिंग, मयंक यादव, रिंकू सिंग, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर.
45
Image Credit : X/BCCI
या खेळाडूंची पुन्हा एन्ट्री
दुखापतीतून सावरलेले आणि विश्रांतीनंतर परतलेले खेळाडू: संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
55
Image Credit : X/BCCI
श्रेयस अय्यर असणार कॅप्टन
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही मालिका खेळणार आहे. तिलक वर्मा उपकर्णधार असेल. संपूर्ण संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

