IND vs PAK Asia Cup Match स्टेडियममध्ये प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत आणि नंतर भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाईल अशी मोठी घोषणा करण्यात आली होती. पण झाले काही वेगळेच.

IND vs PAK Asia Cup Match : आशिया चषकात भारताविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या लढतीत उतरण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा लाजीरवाणा अनुभव आला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला पाकिस्तान संघ सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरला तेव्हा डीजेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. स्टेडियममध्ये प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत आणि नंतर भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाईल अशी मोठी घोषणा करण्यात आली होती. पाकिस्तानी खेळाडू राष्ट्रगीत गायला तयार असताना स्टेडियमच्या लाऊडस्पीकरवर 'जलेबी बेबी' हे अल्बम गाणे वाजू लागले. हे ऐकून पाकिस्तानी खेळाडू चकित झाले. काही सेकंद हे गाणे वाजले असले तरी या घटनेमुळे पाकिस्तान आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. लगेचच चूक लक्षात आल्यावर आयोजकांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला २० षटकांत ९ गडी बाद १२७ धावाच करता आल्या. ४४ चेंडूत ४० धावा करणारा सलामीवीर साहिबजादा फरहान हा पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शेवटी तुफानी फलंदाजी करणाऱ्या शाहीन शाह अफ्रिदीने १६ चेंडूत ३३ धावा काढून नाबाद राहिला. सरदार आणि आफ्रिदी व्यतिरिक्त फखर जमान (१७), फहीम अश्रफ (११), आणि सूफियान मुकीम हेच पाकिस्तानी संघातून दुहेरी धावा करू शकले. भारताकडून कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देऊन ३ बळी घेतले तर अक्षर पटेलने ४ षटकांत १८ धावा देऊन २ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने २८ धावा देऊन २ बळी घेतले.

Scroll to load tweet…

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला पहिल्याच चेंडूत धक्का बसला. भारताकडून नवीन चेंडू घेऊन गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याने टाकलेला पहिला चेंडू वाइड होता, पण कायदेशीररित्या टाकलेल्या पहिल्याच चेंडूत पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयूब बाद झाला. हार्दिकच्या चेंडूवर अयूबला जसप्रीत बुमराहने झेलबाद केले. दुसऱ्या षटकात बुमराहने मोहम्मद हारिसला हार्दिकच्या हाती झेलबाद करून पाकिस्तानची सुरुवातच खराब केली. त्यानंतर एकामागे एक विकेट पडत राहिल्या. अखेर भारताने उत्कृष्ट फलंदाजी करत पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले.