IND vs NZ : किशन-SKY चं वादळ, कालच्या क्रिकेट सामन्यात काय झालं? वाचा सविस्तर
IND vs NZ 2nd T20 : न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत ईशान किशनने अवघ्या 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावा केल्या. दमदार पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 82 धावा करत नाबाद राहिला.
13

Image Credit : AFP
दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा मोठा विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडच्या 208 धावांचा पाठलाग करताना भारताने किशन आणि सूर्यकुमारच्या खेळीमुळे 15.2 षटकांतच विजय मिळवला.
23
Image Credit : X/BCCI
ईशान किशनचे वादळ, SKY चे दमदार पुनरागमन
ईशान किशनने 32 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारांसह 76 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 37 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांसह 82 धावांवर नाबाद राहिला. शिवम दुबेने 18 चेंडूत 36 धावा केल्या.
33
Image Credit : X Handle
न्यूझीलंडची खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
न्यूझीलंडची गोलंदाजी खूपच खराब होती. जॅक फोक्सने 3 षटकांत 67 धावा दिल्या. क्षेत्ररक्षणही सुमार होते. या विजयामुळे भारताने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

