सार
क्रीडा मंत्रालयाने नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड २०२४ साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मनु भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
Khel Ratna Award 2024: खेळ रत्न हा क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. हा पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू बाळगतो. प्रतिभावान खेळाडूंची निवड करून राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार प्रदान केला जातो. क्रीडा मंत्रालयाने नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड (NSA) 2024 साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत नेमबाज मनु भाकर, वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजेता डी. गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. याशिवाय, ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार आणि ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.
१७ जानेवारी २०२५ रोजी क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये या खेळाडूंना गौरविण्यात येईल. देशातील या सर्वोच्च सन्मानाची सुरुवात १९९१-९२ साली झाली होती आणि आता याला जवळपास ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कोणाला मिळू शकतो खेल रत्न पुरस्कार?
इंडियन होम मिनिस्टरच्या वेबसाइटवर उपलब्ध रिपोर्टनुसार, खेल रत्न पुरस्कार देण्यासाठी जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा कोणताही भेदभाव होत नाही. या पुरस्कारासाठी समाजातील कोणत्याही क्षेत्रातील खेळाडू पात्र ठरू शकतात.
खेलरत्न पुरस्काराठी निवड कशी केली जाते
खेलरत्न पुरस्काराची निवड युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे केली जाते. हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. यासोबतच राष्ट्रपती सन्मानित व्यक्तींना प्रमाणपत्र आणि पदक देतात. हा पुरस्कार देताना काही रक्कमही दिली जाते.
खेल रत्न मिळवणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा:
खेल रत्न मिळवणाऱ्या कोणत्याही खेळाडूला सरकारकडून सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. हा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंना २५ लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते. तसेच, त्यांना एक पदक आणि प्रमाणपत्रही प्रदान केले जाते. ही रक्कम आधी ७.५ लाख रुपये होती, पण नंतर मोदींच्या भाजप सरकारने ती वाढवून २५ लाख रुपये केली. या पुरस्काराची सुरुवात राजीव गांधी यांच्या नावावरून झाली होती, पण नंतर त्याचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यात आले.
आणखी वाचा-
मनू भाकर, डी. गुकेशसह ४ जणांना मिळणार 'खेलरत्न'; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
गौतम गंभीर यांच्या भविष्यावर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रभाव?