आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ इंग्लंडशी टी २० सामने खेळणार आहे. या मालिकेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता असून, तो सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील गावस्कर यांनीही वैभवच्या समावेशाला पाठिंबा दिला आहे.

आयर्लंड संघाच्या विरोधात भारताचा पराभव झाल्यामुळं संघाची पुढील वाटचाल खडतर झाली आहे. आता संघ इंग्लंड संघाच्या विरोधात टी २० सामने खेळायला मैदानात उतरणार आहे. वैभव सूर्यवंशीला या सामन्यात संघात स्थान मिळत का नाही याकडं सर्व चाहत्यांच लक्ष लागून राहील आहे. इंग्लंड संघाच्या विरोधात वैभवला संघात स्थान देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सुनील गावस्कर काय म्हणाले? 

वैभव सूर्यवंशीच्या संघातील आगमनाबद्दल यावेळी सुनील गावस्कर यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आयर्लंड संघाच्या विरोधातील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात येईल. वैभवची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याला इंग्लंडच्या गोलंदाजांनी अजून खेळताना पाहिलेलं नाही. वैभव हे खेळायला निडर असल्याचं आपल्याला आयपीएलमध्ये दिसून आलं आहे.

वैभव सचिनचा रेकॉर्ड तोडणार का? 

वैभव हे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. वैभव आता फक्त १५ वर्षांचे असून त्यांच्याकडं संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहील आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ल्सकडून खेळताना त्यांनी चांगला खेळ केला होता. सचिनचा सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम वैभव तोडतो का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.