Fathers of Indias World Cup Winning Cricketers : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयामागे केवळ खेळाडूंची मेहनतच नाही, तर त्यांच्या पालकांचे त्याग, संघर्ष आणि स्वप्नेही जोडलेली आहेत. चला जाणून घेऊया या चॅम्पियन्सचे वडील काय करतात...

Fathers of Indias World Cup Winning Cricketers : लोक तुमचं यश पाहतात, संघर्ष नाही, असं म्हणतात. पण या भारतीय महिला क्रिकेटपटूंचा संघर्षही कौतुकास्पद आणि पाहण्यासारखा आहे. कारण लहान शहरांमधून येऊन आणि आर्थिक अडचणींचा सामना करूनही या मुलींनी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. चला, आज आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंचे कुटुंबीय काय करतात...

वडिलांचं स्वप्न मुलीने पूर्ण केलं

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे वडील हरमिंदर सिंग भुल्लर कोर्टात लिपिक होते. त्यांना स्वतः एक क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण नोकरी आणि आर्थिक परिस्थितीमुळे ते आपलं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. त्यांची मुलगी हरमनप्रीत कौरने त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि भारताला विश्वविजेता बनवलं.

अमनजोत कौरचे वडील आहेत सुतार

भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर, जी आपल्या बॅट आणि चेंडूने कमाल करते, तिच्या वडिलांचे नाव भूपेंद्र सिंग आहे आणि ते एक सुतार आहेत. त्यांनीच आपल्या मुलीसाठी पहिली बॅट बनवली होती आणि तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पाठिंबा दिला. ते तिला मोहाली ते चंदीगडपर्यंत स्कूटरवरून क्रिकेट अकादमीत घेऊन जात असत.

राधा यादवचे वडील विकायचे भाजी

भारतीय महिला गोलंदाज राधा यादवने आपल्या गोलंदाजीने विश्वचषकात सर्वांना प्रभावित केलं. तिचे वडील ओम प्रकाश यादव मुंबईच्या कांदिवली पश्चिमेला दूध आणि भाजीपाल्याचं दुकान चालवत होते. पण अनेक अडचणी असूनही त्यांनी आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.

इतर क्रिकेटपटूंचे वडील काय करतात?

भारतीय गोलंदाज उमा छेत्रीचे वडील शेतकरी आहेत. दीप्ती शर्माचे वडील कानपूरमध्ये छोटा व्यवसाय करतात. शेफाली वर्माचे वडील एक ज्वेलर्स आहेत, तर जेमिमा रॉड्रिग्सचे वडील क्रिकेट प्रशिक्षक आहेत. या सर्व महिला क्रिकेटपटू सामान्य कुटुंबातून येतात, पण तरीही त्यांच्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी आपली स्वप्नं पूर्ण केली आणि आज देशाला विश्वविजेता बनवलं.