- Home
- Sports
- Cricket
- 'होय, RCB टीम खरेदीसाठी मोठी बोली लावली आहे..', महाराष्ट्रातील अब्जाधीशाने दिली माहिती
'होय, RCB टीम खरेदीसाठी मोठी बोली लावली आहे..', महाराष्ट्रातील अब्जाधीशाने दिली माहिती
IPL 2026 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमला नवीन मालक मिळण्याची दाट शक्यता आहे. फार्मा उद्योजक अदर पूनावाला यांनी RCB फ्रँचायझी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले असून, मोठी बोली लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयपीएल 2026
आयपीएल 2026 स्पर्धेला अजून 45 दिवस बाकी आहेत. या स्पर्धेपूर्वी आरसीबीला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. वृत्तांनुसार, अब्जाधीश फार्मा उद्योजक अदर पूनावाला यांनी आरसीबी फ्रँचायझी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले आहे.
आयपीएल 2026
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या हंगामात आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर सध्याच्या मालकांनी संघ विकण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएल 2026
तेव्हापासून, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड फ्रँचायझी विकण्याचा विचार करत होती. फ्रँचायझीने नोव्हेंबरमध्ये संघ विक्रीसाठी ठेवला होता.
आयपीएल 2026
आरसीबी संघ खरेदी करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. फार्मा उद्योजक अदर पूनावाला यांचे नाव आघाडीवर आहे. पूनावाला यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली असून, आरसीबीसाठी मोठी बोली लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयपीएल 2026
पुढील महिन्यात आयपीएल फ्रँचायझी आरसीबीसाठी मोठी आणि चांगली बोली लावणार असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. पण ते किती पैसे खर्च करण्यास तयार आहेत, हे त्यांनी गुप्त ठेवले आहे.
आयपीएल 2026
वृत्तांनुसार, आरसीबी फ्रँचायझीची किंमत 18,000 ते 20,000 कोटी रुपये असू शकते. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात महागड्या संघांपैकी एक आहे. या संघात विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यासारखे खेळाडू आहेत.
आयपीएल 2026
अदर पूनावाला हे 2 लाख कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेले अब्जाधीश आहेत. अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत.

