सार

सध्या सोशल मीडियावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हा सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हा सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने सुरुवातीला कॅच घेतला आणि तो सीमारेषेवर असल्यामुळे त्याने परत बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि तो बाहेर जाऊन परत तो कॅच घेण्याचा प्रयत्न करतो आणि भारताचा विजयाकडे जाण्याचा मार्ग यशस्वी होतो. यावेळी एक चाहता झाडावर चढल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 

झाडावर चढून काढत होता व्हिडीओ - 
भारतीय संघाचा हा चाहता झाडावर चढून व्हिडीओ काढत आलस्याचे दिसून आले आहे. तो झाडावर चढून भारतीय संघातील खेळाडूंचे व्हिडीओ काढत होता. यावेळी भारतीय संघातील खेळाडू बसवर चढले होते आणि वर्ल्डकपमधील ट्रॉफीसोबत ते व्हिडीओ काढत असल्याचे दिसून आले होते. यावेळी हा चाहता झाडावर चढून आपल्या आवडत्या खेळाडूंचे व्हिडीओ काढत असल्याचे दिसून आले.

सोशल मीडियावर चाहता झाला ट्रोल - 
सोशल मीडियावर या चाहत्याला फॉलोवर्सकडून ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. हा चाहता झाडावर चढून पुढे होऊन फोटो काढत होता. तो झाडाच्या फांदीवर खूप पुढे निघून गेला होता पण त्याने यावेळी आपण पडू शकतो किंवा आपल्याला दुखापत होऊ शकते असा अंदाज घेतला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चाहत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.