- Home
- Mumbai
- Mumbai Railway Block : मुंबईकरांनो सावधान! पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासा
Mumbai Railway Block : मुंबईकरांनो सावधान! पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासा
Western Railway 30 day mega block : पश्चिम रेल्वेने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी ३० दिवसांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला. या काळात पाचवा मार्ग पूर्णपणे बंद राहणार असून लोकलसह अनेक मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठे बदल होणारय

मुंबईकरांनो सावधान! पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक
Western Railway Mega Block : मुंबई आणि उपनगरातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी तब्बल 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत लोकलसह प्रवासी, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत.
लोकल प्रवाशांनी विशेष लक्ष द्यावे
हा जम्बो ब्लॉक शनिवारी रात्रीपासून सुरू होणार असून सलग 30 दिवस चालणार आहे. या काळात पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे काम हाती घेणार आहे. कांदिवली–बोरिवली विभागात
रूळ बदल
विविध ठिकाणी क्रॉसओव्हर बसवणे व काढणे
सिग्नलिंग, अभियांत्रिकी आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे
केली जाणार आहेत.
पाचवा मार्ग राहणार पूर्णपणे बंद
या ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील पाचवा मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा लागणार असून, याचा थेट परिणाम लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक कसे असेल?
पाचव्या मार्गावरून धावणाऱ्या सर्व लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाड्या अंधेरी किंवा गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे
काही लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द होतील
काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येईल
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वेळेचे नियोजन महत्त्वाचे
30 दिवस चालणाऱ्या या जम्बो ब्लॉकमुळे गर्दी, विलंब आणि वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता असल्याने, मुंबईकरांनी पर्यायी प्रवास मार्गांचा विचार करूनच घराबाहेर पडावे, असेही सांगण्यात आले आहे.

