केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाची माहितीही त्यांनी घेतली.

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. काल शुक्रवारी त्यांचं आगमन झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा महाराष्ट्रात स्वागत केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार असून तिथे गेल्यानंतर ते गणपतीचे दर्शन घेतील.

विनोद तावडे यांच्याशी केली चर्चा 

गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबतचे तपशील मिळू शकलेले नाहीत. राज्यातील मराठा आरक्षण, बिहार निवडणूक आणि उप्राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या बाबत हे बोलणं झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईत सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतची माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली.

आज उपोषणाचा दुसरा दिवस 

मनोज जरांगे यांनी कालपासुन आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन ते मुंबईत दाखल झाले आहेत. या उपोषणावर काही तोडगा निघतो का हे लवकरच दिसून येणार आहे.

अंधेरीनगरी अमित शाह यांच्या स्वागताला सज्ज 

अंधेरी येथे सर्वात आधी गृहमंत्री अमित शाह हे गणपतीच्या दर्शनाला येत असल्यामुळे सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. अमित शाह शनिवारी दुपारी दीड वाजता अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास रोडवर असलेल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपती मंडपात विराजमान बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अमित शाह हे गुजराती मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या दर्शनाला येत असल्यामुळे समाजात उत्साह निर्माण झाला आहे.

जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…