Thane Water Cut: ठाणे शहरात शुक्रवारी, ३० तारखेला, मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ६ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत घोडबंदर रोड, वर्तकनगर, लोकमान्यनगरसह अनेक भागांत पाणी येणार नाही. 

Thane Water Cut News: ठाणे शहरात उद्या म्हणजेच शुक्रवारी (३० तारीख) पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरात ६ तासांचा 'शटडाऊन' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवणे आवश्यक आहे.

नेमकं कारण काय?

ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली परिसरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. ही गळती रोखण्यासाठी तातडीने दुरुस्ती काम हाती घेतले जाणार आहे. सोबतच, इंदिरानगर परिसरातील पाण्याच्या टाकीची (संप) स्वच्छताही याच काळात केली जाणार आहे.

पाणी कधी बंद राहणार?

दिनांक: शुक्रवार, ३० तारीख

वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत (एकूण ६ तास)

या भागांत पाणी येणार नाही

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, खालील परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल

घोडबंदर रोड, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर.

ऋतुपार्क, सिद्धेश्वर, सिद्धांचल आणि समतानगर.

जेल परिसर, गांधीनगर, रुस्तमजी आणि इटर्निटी.

जॉन्सन, इंदिरानगर, श्रीनगर.

रुपादेवी पाडा, किसननगर आणि सावरकरनगर.

महत्त्वाची सूचना

शटडाऊन संपल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर सुरुवातीला काही काळ कमी दाबाने पुरवठा होऊ शकतो. तसेच यंत्रणा पूर्णपणे पूर्वपदावर येण्यास १ ते २ दिवस लागू शकतात.

महापालिकेचे आवाहन

पाणी कपातीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा. आवश्यक कामांसाठी पाणी आधीच साठवून ठेवावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने केले आहे.