Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीत बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, इमारतींच्या काचा फुटल्या

| Published : May 23 2024, 02:50 PM IST / Updated: May 23 2024, 04:14 PM IST

Dombivli MIDC Blast

सार

एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.

 

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी अजूनही स्फोट सुरु असल्याचेही समजते. त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे.