Dombivali Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील कंपनीला आग, स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट

| Published : Jun 12 2024, 11:18 AM IST / Updated: Jun 12 2024, 11:22 AM IST

Dombivali Fire
Dombivali Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील कंपनीला आग, स्फोटांच्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Dombivali Fire: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो माईन्स (Indo Mines) कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

 

Dombivali Fire: डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो माईन्स (Indo Mines) कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेनंतर अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या इंडो माईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.

डोंबिवली एमआयडीत अनेक केमीकल कंपन्या आहेत. साधारण 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसल्याचे दिसून येत आहे. विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढले असून जिथे घटना घडली, तिथे कोणी अडकले आहेत की नाही याची माहिती मिळू शकत नाही आहे.

आणखी वाचा :

Terrorist Attack : जम्मू-काश्मीर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, तीन दिवसात 3 हल्ले; कठुआमध्ये एक दहशतवादी ठार