सार
मुंबादेवी मतदारसंघातील भाजप उमेदवार शायना एनसी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. सावंतांनी त्यांना 'माल' म्हटल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
मुंबई : मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शायना एनसी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थवरील या भेटीनंतर शायना एनसी पत्रकारांशी बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली.
शायना एनसी म्हणाल्या, "अरविंद सावंत यांचा 'माल' हा शब्द वापरून एक सक्षम महिलेला कमी लेखणे, यांची मानसिक स्थिती दर्शवते." त्यांनी अरविंद सावंतांच्या भाषणातील एक क्लिप पत्रकारांना दाखवत संताप व्यक्त केला. "बाहेरचा माल चालणार नाही. इथलाच माल चालणार," असे सावंतांनी म्हटले होते, ज्यावर शायना एनसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
"हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. त्यांच्या बळावर ते निवडून आले," असे सांगत शायना एनसी यांनी स्पष्ट केले की त्यांना सावंतांचा आदर नाही. "मी मुंबईची लाडली आहे आणि मला इथे काम करायचं आहे. अरविंद सावंत यांचे प्रमाणपत्र मला लागत नाही."
ते पुढे म्हणाल्या, "महिलेला 'माल' म्हणून संबोधणे हे अपमानकारक आहे. महिलांचा सन्मान केला, तर आदर मिळतो. तुम्ही महिलांना कमी लेखल्यास त्याचे परिणाम 20 तारखेला तुम्हाला कळतील."
राज ठाकरेंच्या भेटीबाबत शायना एनसी म्हणाल्या, "राज ठाकरेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही."
शायना एनसीच्या या शब्दांनी आगामी निवडणुकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले आहे, आणि यामुळे अरविंद सावंत यांच्यासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.
आणखी वाचा :
माहीमच्या जागेवर राज ठाकरेंच्या मुलाला भाजपचा पाठिंबा, शिंदें शिवसेनेला धक्का!