शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरही सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ पाहायला मिळाली. उबाठा गटातील अत्यंत विश्वासू आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना रामराम केला. यामुळे उद्धव ठाकरेंना सहा खासदार सोडून गेल्यानंतर पुन्हा एकदा मोठा धक्का बसला गेला. यानंतर आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच त्यांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय सचिन अहिर यांना विधानसभेच्या उपसभापतीचे पद देण्यात आले. आज (08 जुलै) सकाळी सचिन अहिर यांनी शरद पवारांची निवासस्थानी भेट घेतली. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सचिन अहिर यांनी भेट घेतली. शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र भेट घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. सचिन अहिर यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, ही एक सदिच्छा भेट होती. याआधीही गेल्या सचिन अहिर यांनी उपसभापती पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. 

शरद पवारांचा फोन 
सचिन अहिर यांनी विधानसभेच्या उपसभापती पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांचा त्यांना फोन आला होता. यावेळी शरद पवारांनी सचिन अहिरांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय सचिन अहिर यांनी फोनवरुन शरद पवारांना भेटीसाठी विचारले होते. 

सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर उबाठाकडून प्रतिक्रिया
सचिन अहिर यांनी उबाठामधून एक्झिट घेतल्यानंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. उबाठा गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते की, सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशामुळे खासदार फोडण्यातही सचिन अहिरांचा हात असल्याचे विधान केलं होत. याशिवाय आदित्य ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली होती. 

आदित्य ठाकरेंनी म्हटले की, सचिन अहिरांना आम्ही कशी कमतरता भासू दिली. भावाकडे महापालिका दिली. मुलीकडे प्रभाग समिती दिली. याशिवाय आम्ही रोज भेटत होतो. पण अहिरांसारख्यांची रोज आरती करायची का असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थिती केला होता. याशिवाय ज्यांना सर्वकाही मिळतं तेच निघून जातायत असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.