MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • नवी मुंबईत झोपडीधारकांसाठी सुवर्णसंधी! ७२ हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घर; कोणाला मिळणार मोफत आणि कोणाला मोजावे लागणार पैसे?

नवी मुंबईत झोपडीधारकांसाठी सुवर्णसंधी! ७२ हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घर; कोणाला मिळणार मोफत आणि कोणाला मोजावे लागणार पैसे?

Navi Mumbai slum housing scheme: नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील सुमारे ७२ हजार झोपडीधारक कुटुंबांना आता हक्काचे घर मिळणार आहे. सरकारच्या नव्या धोरणानुसार, २००० पूर्वीच्या रहिवाशांना मोफत, तर २०११ पर्यंतच्या रहिवाशांना सवलतीच्या दरात घर दिले जाईल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 19 2026, 04:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नवी मुंबईत झोपडीधारकांसाठी सुवर्णसंधी! ७२ हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घर
Image Credit : our own

नवी मुंबईत झोपडीधारकांसाठी सुवर्णसंधी! ७२ हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घर

नवी मुंबई : झपाट्याने विकसित होणाऱ्या नवी मुंबई शहरात आता झोपडपट्टीमुक्त उपक्रमाला मोठी गती मिळणार आहे. बेलापूर मतदारसंघातील हजारो कुटुंबांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार असून, सुमारे ७२ हजार नागरिकांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पात्रतेचे नवे निकष, कोणाला काय मिळणार?
Image Credit : our own

पात्रतेचे नवे निकष, कोणाला काय मिळणार?

राज्य सरकारने झोपडीधारकांसाठी दोन मुख्य श्रेणी निश्चित केल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे

पूर्णपणे मोफत घर: ज्या झोपडीधारकांचे पुरावे सन २००० पूर्वीचे आहेत, त्यांना हक्काचे घर मोफत मालकी हक्काने दिले जाणार आहे.

सवलतीच्या दरात घर: जे नागरिक २००० ते २०११ या कालावधीत वास्तव्यास आले आहेत, त्यांना केवळ २.५ लाख रुपये भरून घराचा मालकी हक्क मिळवता येईल. 

Related Articles

Related image1
जिद्द डोंगराएवढी! बाळंतपणाच्या जखमा ओल्या असतानाही १० दिवसांच्या लेकराला घेऊन माऊली पोहोचली परीक्षेला; नांदेडच्या शीतलची काळजाला भिडणारी कहाणी
Related image2
भिवंडीत भाजपला खिंडार! ९ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत रचला सत्तेचा नवा 'सेक्युलर फ्रंट'
35
आमदार मंदा म्हात्रे यांची पुढाकार आणि बैठकीतील निर्णय
Image Credit : Twitter

आमदार मंदा म्हात्रे यांची पुढाकार आणि बैठकीतील निर्णय

गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितले की, बेलापूर मतदारसंघातील ७२,६६५ कुटुंबांच्या आयुष्यात आता 'अच्छे दिन' येणार आहेत. 

45
महत्त्वाचे निर्देश
Image Credit : Twitter

महत्त्वाचे निर्देश

बायोमेट्रिक सर्वेक्षण: सर्व पात्र झोपडीधारकांचे बायोमेट्रिक आणि डीएसआर (DSR) तयार करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तुर्भे पॅटर्न: तुर्भे येथील शिवाजी नगर भागात 'जीबीआर' प्रक्रिया आधीच सुरू झाली असून ती आता प्रगत टप्प्यावर पोहोचली आहे.

मार्गदर्शन मेळावा: या योजनेचा लाभ कसा घ्यावा, यासाठी लवकरच नागरिकांसाठी मोठा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला जाणार आहे. 

55
कुठल्या भागातील नागरिकांना होणार लाभ?
Image Credit : Twitter

कुठल्या भागातील नागरिकांना होणार लाभ?

या निर्णयाचा सर्वाधिक फायदा तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. शहराच्या नियोजित विकासामध्ये या प्रकल्पामुळे नवी मुंबईचे रूप पालटणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image2
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Recommended image3
Vidhan Parishad | महायुतीचे 6 बिनविरोध, नाशिक-जळगावात बंडखोरी
Recommended image4
TUKARAM MUNDHE | पण साहेब या भेसळखोरांची तक्रार करायची तरी कुठे, पाहा हा पर्याय
Recommended image5
Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये भाजीपाल्याची विक्री; व्हायरल व्हिडीओनंतर रेल्वे प्रशासनावर प्रश्न (Watch Video)
Related Stories
Recommended image1
जिद्द डोंगराएवढी! बाळंतपणाच्या जखमा ओल्या असतानाही १० दिवसांच्या लेकराला घेऊन माऊली पोहोचली परीक्षेला; नांदेडच्या शीतलची काळजाला भिडणारी कहाणी
Recommended image2
भिवंडीत भाजपला खिंडार! ९ नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत रचला सत्तेचा नवा 'सेक्युलर फ्रंट'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved