MVA Meeting : बुधवारी महाविकास आघाडीची खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 23 आमदार आले नाहीत. यामुळे माविआमध्ये टेन्शन वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

MVA Meeting : उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटातून सहा खासदारांनी बंड केले. याचा मोठा फटका उबाठाला बसला. याच दरम्यान, बुधवारी महाविकास आघाडीची खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला बड्या नेत्यांनी उपस्थिती लावणे अपेक्षित होते. मात्र माविआमधील 60 पैकी केवळ 37 आमदार बैठकीला आले. अशातच 23 आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले. खास बाब म्हणजे, बैठकीला शरद पवार आलेच नाहीत. यामुळेच उद्धव ठाकरे यांना वाईट वाटल्याचे बोलले जात आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी माविआमध्ये एकी आहे की नाही असा प्रश्नही उपस्थिती केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या खास बैठकीला 23 आमदार आले नाहीत. यामुळे माविआमध्ये टेन्शन वाढले आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय महाविका आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का?, आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असे प्रश्न उपस्थिती केले. यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून विरोधकांनी एकी दाखवावी. राज्यभरात सभा, बैठका, आंदोलने एकत्रित झाले पाहिजे. तसेच माविआची एकी राज्यभर दिसायला हवी असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जे गेले त्यांना जाऊ द्या- उद्धव ठाकरे

खासदारांनी बंड केल्याच्या प्रकारावरही विधान केले. उद्धव ठाकरेंनी म्हटले की, जे सोबत आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. जे गेले त्यांना जाऊ द्या. बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावली नाही. या गोष्टीमुळे माविआमधील एकीबद्दल अधिक चर्चा सुरू झाल्या आहेत. तर 16 गैरहजर आमदारांमध्ये काँग्रेसचे सहा, ठाकरे-पवारांच्या गटातील प्रत्येकी पाच आमदार आले नाहीत. आमदार उपस्थित न राहण्याचे कारण समजू शकलेले नाही.

बैठकीला अनुपस्थितीत राहिलेले आमदार

  • जयंत पाटील (शपा)
  • नाना पटोले (काँग्रेस)
  • विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
  • अमित देशमुख (काँग्रेस)
  • रोहित पवार (शपा)
  • अस्लम शेख (काँग्रेस)
  • संदीप क्षीरसागर (एनसीपी शरद पवार)
  • सुनील राऊत (ठाकरे सेना)
  • गजनान लवटे (ठाकरे सेना)
  • बाबाजी काळे (ठाकरे सेना)
  • राहुल पाटील (ठाकरे सेना)
  • संजय दरेकर (ठाकरे सेना)
  • विश्वजीत कदम (काँग्रेस)
  • अभितीज पाटील राष्ट्रवादी (शप)
  • विकास ठाकरे (काँग्रेस)