शिवसेना-उबाठाला जय महाराष्ट्र केल्यानंतरही खासदार ओमराजे निंबाळकर यांची अजूनही टीकाकारांकडून सुटका झालेली दिसत नाही. त्यांचा हा निर्णय चुकला आहे, हे सांगण्यासाठी त्यांच्यावर सोशल मीडियात शेरेबाजी करणे सुरुच आहे, विशेष म्हणजे कालपर्यंत त्यांच्या जवळ असणारे आणि निष्ठावंत असणारे आपण तुमच्यापासून लांब जात असल्याचं लिहत आहेत.

धाराशीव : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना-उबाठाला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिसून येत आहेत, काही प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी तरी देखील आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. पण बंद दाराआड झालेली चर्चा, सर्वांनाच पचलेली दिसत नाही. अर्थात लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या तुलनेने मोठा असतो, म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाला अजूनही विरोध होत असताना दिसून येत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

'आमची जिरली, बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या'

ओमराजे निंबाळकर यांचा फोटो शेअर करत फोटोवर लिहीले आहे, आमची जिरली, तर वर लिहीले आहे, बाबाही गेल्या आणि दशम्याही. ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची 20 वर्षापूर्वीच हत्या झाली होती. त्याचा निकाल 2 दिवसांपूर्वी लागला, यात आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरुन ओमराजे निंबाळकर यांच्या एकूण परिस्थितीवर सोशल मीडियावर ही शेरेबाजी करण्यात येत आहे.

23 हजार फॉलोअर्सचं पेज आता 'उबाठा'ला

एका कार्य़कर्त्याने फेसबूकवर 23 हजार फॉलोअर्सचं पेज जे ओमराजे निंबाळकर यांच्या नावाने आहे ते पेज, ओमदादा आजपासून शिवसेना उबाठाला देत असल्याचं म्हटलं आहे. ओमदादा तुमचा जो काही निर्णय शिवसेना-उबाठा सोडण्याचा झाला, तो आपल्याला पटलेला नाही, असं देखील त्या पेजवर सांगण्यात आलेले आहे. एकंदरीत ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी स्वत: हून पेज चालवणाऱ्यांना निष्ठावंतांना देखील हा निर्णय पटलेला नाही. पण आपण निधी अभावी, तसेच कोणतीही मदत विरोधात असल्याने होत नाही, म्हणून आपण शिवसेना-उबाठा सोडत असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे.

धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना-उबाठा सोडल्यानंतरच्या काही विरोधातल्या प्रतिक्रिया लगेच सोशल मीडियावर आलेल्या आहेत, मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने अजून कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. ओमराजे निंबाळकर यांचं स्वागत आहे, अशा पोस्ट देखील व्हायरल झालेल्या आहेत, यावर एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसून आलेला आहे. एकंदरीत ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना-उबाठा सोडल्यानंतरही टीकाकार त्यांना अजून तरी सोडत नसल्याचं किंवा हा विषय वाढतोय पण कमी होताना दिसत नाहीय. म्हणून यात आणखी काही घडामोडी निश्चितच दिसून येणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात जाऊन लोकांची माफी मागण्यास सुरुवात केली आहे.