मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. अशातच रस्त्यालगची कमकुवत झाडे कोसळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे महापालिकेच्या कामकावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर पडकला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत धो धो पाऊस कोसळत आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाडं कोसळल्याची दुर्घटना घडली. यानंतरही मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी भर पावसात झाडं कोसळत असल्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

सांताक्रूझमधील घटना

सांताक्रूझमध्ये झाडं कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 8 जण जखमी झाल्याचे समोर आले. झाडं कोसळल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

माटुंगा परिसरात झाड कोसळलं, २ वाहनांचं नुकसान

माटुंगामध्ये देखील झाडं कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय रस्त्यालगत महापालिकेने भर पावसाळ्यात झाडं कापून ठेवली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

किंग्स सर्कल येथेही वाहनांवर झाडं पडून नुकसान

किंग्स सर्कल भागात पाणी साचले जाते. या ठिकाणी देखील वाहनांवर झाडं कोसळून वाहनांचे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांनीही महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. 

दादरच्या फुल मार्केट परिसरात झाडं कोसळलं

दादरच्या फुल मार्केट परिसरात झाडं कोसळल्याची दुर्घटना मध्यरात्री झाली. फुलमार्केट परिसरात सदर घटना घडल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

View post on Instagram