लालबागच्या राजाची पहिली झलक, यंदा कसा आहे बाप्पाचा थाट?
- FB
- TW
- Linkdin
)
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) आज पहिली झलक पाहायला मिळाली. लालबागच्या राजाच्या लूकचे अनावरण झाले की मुंबईत गणेशोत्सव सुरू होतोय, असे मानले जाते. तुम्हाला लालबागच्या राजाची पहिला झलक पाहायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.
अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाचे लालबागच्या राजाचे हे 91 वे वर्ष आहे. यंदा मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा पोशाख मरुन रंगाचा आहे.
पुतळाबाई चाळीमध्ये असलेला लालबागचा राजा किंवा ‘किंग ऑफ लालबाग’ हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिले जाणारे गणेश मंडळ आहे.
लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे.
सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो मुंबईकर दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगांत उभे राहतात. गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात माहिती आहे.