MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Metro 9: मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला मेट्रो धावणार; मुख्यमंत्री दाखवणार हिरवा कंदील

Mumbai Metro 9: मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला मेट्रो धावणार; मुख्यमंत्री दाखवणार हिरवा कंदील

Mumbai Metro 9: दहिसर-मिरा भाईंदर (मेट्रो ९) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ६ एप्रिल रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, ही सेवा दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान चार स्थानकांवरून सुरू होईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 04 2026, 08:13 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मिरा भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला मेट्रो धावणार
Image Credit : Getty

मिरा-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला मेट्रो धावणार

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या दहिसर-मिरा भाईंदर (मेट्रो ९) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. सुरक्षेच्या सर्व चाचण्या आणि प्रमाणपत्रे पूर्ण झाल्यानंतर, आता या मेट्रोचे लोकार्पण ६ एप्रिल रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना या सोहळ्याची तारीख आणि तपशील जाहीर केला. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
६ एप्रिलला होणार 'ग्रँड' लोकार्पण
Image Credit : ANI

६ एप्रिलला होणार 'ग्रँड' लोकार्पण

मेट्रो ९ मार्गिकेचा पहिला टप्पा पूर्णपणे सज्ज असून, ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात येईल. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, प्रताप सरनाईक आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

Related Articles

Related image1
Mumbai Local: मुंबईकरानो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवार 'जम्बो' ब्लॉक; वांद्रे टर्मिनससह लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल
Related image2
MHADA Lottery: सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! कोकण मंडळाची अडीच हजार घरांची सोडत; पाहा कुठे आणि किती स्वस्त?
35
उद्घाटनाला विलंब का झाला?
Image Credit : X

उद्घाटनाला विलंब का झाला?

मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, दहिसर ते काशिगाव दरम्यानचे काम आधीच पूर्ण झाले होते, मात्र 'सुरक्षा प्रमाणपत्र' (Safety Certificate) मिळण्यास उशीर झाला. आता MMRDA कडे हे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच ही सेवा सुरू केली जात आहे. 

45
पहिल्या टप्प्यात 'या' ४ स्थानकांवरून धावणार मेट्रो
Image Credit : X

पहिल्या टप्प्यात 'या' ४ स्थानकांवरून धावणार मेट्रो

एकूण १३.५८ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पापैकी पहिल्या टप्प्यात खालील स्थानकांदरम्यान मेट्रो धावेल.

१. दहिसर पूर्व

२. पांडुरंग वाडी

३. मिरागाव

४. काशिगाव

पुढील टप्प्यातील स्थानकांचे काम अद्याप प्रगतीपथावर असून, लवकरच संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी खुली केली जाईल. 

55
मुंबईकरांना काय फायदा होणार?
Image Credit : X

मुंबईकरांना काय फायदा होणार?

वाहतूक कोंडीतून सुटका: दहिसर चेकनाक्यावरील भीषण ट्रॅफिकमधून मिरा-भाईंदरकरांची सुटका होईल.

वेळेची बचत: रस्ते मार्गाने लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत मेट्रोने प्रवास केल्यास ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.

आरामदायी प्रवास: पश्चिम उपनगरांना जोडणारी ही महत्त्वाची लिंक ठरल्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

६ एप्रिलपासून मिरा-भाईंदरचे नागरिक खऱ्या अर्थाने 'मेट्रो लाईफ'चा अनुभव घेऊ शकणार आहेत. सुरक्षेच्या खात्रीनंतर सुरू होणारी ही सेवा शहराच्या विकासाला नवी गती देईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image2
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image3
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image4
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image5
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
Mumbai Local: मुंबईकरानो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवार 'जम्बो' ब्लॉक; वांद्रे टर्मिनससह लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल
Recommended image2
MHADA Lottery: सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! कोकण मंडळाची अडीच हजार घरांची सोडत; पाहा कुठे आणि किती स्वस्त?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved