MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local Megablock: सावधान! रविवारी मुंबई लोकलचा 'महा-ब्लॉक'; महाशिवरात्रीला घराबाहेर पडण्यापूर्वी हे वेळापत्रक नक्की वाचा

Mumbai Local Megablock: सावधान! रविवारी मुंबई लोकलचा 'महा-ब्लॉक'; महाशिवरात्रीला घराबाहेर पडण्यापूर्वी हे वेळापत्रक नक्की वाचा

Mumbai Local Megablock: रविवारी, मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होतील, तर काही गाड्या विलंबाने धावतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 14 2026, 03:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सावधान! रविवारी मुंबई लोकलचा 'महा ब्लॉक'
Image Credit : SOCIAL MEDIA

सावधान! रविवारी मुंबई लोकलचा 'महा-ब्लॉक'

मुंबई : सण असो वा उत्सव, मुंबईकरांची 'लाईफलाईन' समजली जाणारी लोकल सेवा तांत्रिक कामांसाठी विश्रांती घेणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रुळांची देखभाल, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याने अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील, तर काही विलंबाने धावतील. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. मध्य रेल्वे: जलद मार्गावर 'ब्रेक'
Image Credit : social media

१. मध्य रेल्वे: जलद मार्गावर 'ब्रेक'

कुठे: माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन जलद मार्ग)

वेळ: सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ पर्यंत.

परिणाम: सीएसएमटीवरून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे प्रवासाला नेहमीपेक्षा १५ ते २० मिनिटे अधिक वेळ लागू शकतो.

Related Articles

Related image1
रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज! लग्नसराई आणि गर्दीसाठी धावणार २४ 'स्पेशल' ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Related image2
Indias First Musical Road: मुंबईत देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’! कोस्टल रोडवर 80 किमी वेगात ऐका ‘जय हो’
36
२. हार्बर मार्ग: कुर्ला-वाशी दरम्यान सेवा खंडित
Image Credit : Getty

२. हार्बर मार्ग: कुर्ला-वाशी दरम्यान सेवा खंडित

कुठे: कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान.

वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत.

परिणाम: सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानच्या फेऱ्या या काळात बंद राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. तसेच, हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्स-हार्बर (ठाणे-वाशी/नेरुळ) मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

46
३. पश्चिम रेल्वे: बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
Image Credit : Getty

३. पश्चिम रेल्वे: बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

कुठे: राम मंदिर ते बोरिवली स्थानकांदरम्यान.

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत.

परिणाम: बोरिवली ते अंधेरी दरम्यान सर्व जलद लोकल धिम्या मार्गावर चालवल्या जातील. काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या केवळ गोरेगावपर्यंतच धावतील.

56
४. रात्रकालीन ब्लॉक (शनिवार रात्र)
Image Credit : Getty

४. रात्रकालीन ब्लॉक (शनिवार रात्र)

विक्रोळी ते मुलुंड दरम्यान शनिवारी मध्यरात्री १:०५ ते पहाटे ४:३५ पर्यंत ब्लॉक असेल.

यामुळे शनिवारी रात्री १२:२४ ची ठाणे लोकल आणि रविवारी पहाटे ४:०४ ची सीएसएमटी लोकल रद्द राहील.

66
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

खारबाव येथे शनिवारी होणारा रात्रकालीन ब्लॉक रेल्वे प्रशासनाने रद्द केला आहे, त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image2
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Recommended image3
'निवडणूक आयोगच व्हिलन', संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना पूर्ण पाठिंबा
Recommended image4
Mumbai Rent : वांद्र्यात 2BHK साठी 80K भाडं, तरुणी म्हणते 'एक-एक पैसा वसूल'; व्हिडीओ व्हायरल
Recommended image5
Pydhonie Death Case Mumbai : कलिंगड नव्हे, काहीतरी वेगळंच! पायधुनी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
Related Stories
Recommended image1
रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज! लग्नसराई आणि गर्दीसाठी धावणार २४ 'स्पेशल' ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Recommended image2
Indias First Musical Road: मुंबईत देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’! कोस्टल रोडवर 80 किमी वेगात ऐका ‘जय हो’
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved