मुंबई लोकलमध्ये स्टंटबाजी करताय सावधान!, तरुणाने गमावले हात-पाय

| Published : Jul 27 2024, 03:06 PM IST / Updated: Jul 27 2024, 03:17 PM IST

Mumbai Local Viral Video new

सार

Mumbai Local Viral Video : मुंबईतल्या एका तरुणाने शिवडी रेल्वेस्थानकावर स्टंट केला होता. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या स्टंटबाज तरुणाला दुसऱ्या स्टंटमध्ये हात आणि पाय गमावावा लागला आहे.

 

Mumbai Local Viral Video : एका तरुणाचा शिवडी स्टेशनवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर याच महिन्यात व्हायरल झाला होता. मुंबई लोकल सुरु असताना हा तरुण लोकलला लटकून पाय घासत जातो आणि प्लॅटफॉर्म संपल्यावर लोकलमध्ये चढतो असे या व्हिडीओत दिसत होते. या तरुणाचा शोध लागला आहे, दुसऱ्या एका स्टंटमध्ये या तरुणाला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे. त्यामुळे आता त्याने असे स्टंट करु नका असे आवाहन केले आहे. मध्य रेल्वेने या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच असे स्टंट करु नका हे आवाहन केले आहे.

व्हायरल व्हिडिओच्या दृश्यात नेमकं काय दिसतंय?

लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे. त्याला डब्यातले लोक सांगत आहेत की, असे करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी प्लॅटफॉर्म संपायला येतो तेव्हा घाईने तो डब्यात चढतो आहे. अशा हुल्लडबाज प्रवाशांमुळे शिस्तीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या. अशा स्टंटबाजांना आवरा, हवेत कशाला जीवघेणे स्टंट?, असे लोक स्वतःची माती करुन घेतात अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी या व्हायरल व्हिडीओवर दिल्या. Mumbai मध्ये अनेकदा असे स्टंट करताना तरुण दिसतात. त्यांनी असे स्टंट करु नयेत असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

 

 

स्टंटबाज तरुणाचा मध्य रेल्वेने घेतला शोध

Mumbai मधल्या व्हायरल व्हिडीओतल्या या तरुणाचा मध्य रेल्वेकडून शोध सुरु होता. जेव्हा या तरुणाचा शोध लागला तेव्हा त्याने एक पाय आणि एक हात गमावला. शिवडीमध्ये स्टंट केल्यानंतर या तरुणाने आणखी एका ठिकाणी स्टंट केला. त्यामुळे त्याला त्याचा हात आणि पाय गमावावा लागला. या तरुणाचे नाव फरहत आझम शेख असून तो अँटॉप हिल, वडाळा येथील रहिवासी आहे. आरपीएफने या तरुणाकडे विचारणा केली असता त्याने व्हायरल व्हिडीओ माझाच आहे अशी कबुली दिली. हा व्हिडीओ ७ मार्च रोजी तयार करण्यात आला होता. शिवडी ते सीएसएमटी लोकलमधून हा स्टंट करण्यात आला होता. यानंतर १४ एप्रिल रोजी मस्जिद बंदर स्थानकात दुसरा स्टंट करत असताना आझम शेखला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे.

फरहत आझम शेखने नेमकं काय म्हटलंय?

“सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ माझाच आहे. मार्च महिन्यात शिवडी स्थानकात मी तो स्टंट केला होता. एप्रिल महिन्यातही मी असाच स्टंट करत होतो तेव्हा मला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे.”

 

 

मध्य रेल्वेचे स्टंटबाज तरुणांना केलं आवाहन

मध्य रेल्वेने या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच लोकल ही तुमच्या प्रवासासाठी आहे असले स्टंट करण्यासाठी नाही. त्यामुळे असे स्टंट करु नका असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

आणखी वाचा :

जालना आणि बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती तयार, शरद पवारांनी केले वक्तव्य