- Home
- Mumbai
- Western Railway Update : मुंबईकरांनो, आता गावची वारी होणार खास! नव्या वर्षात पश्चिम रेल्वे देणार 'हे' मोठं सरप्राईज
Western Railway Update : मुंबईकरांनो, आता गावची वारी होणार खास! नव्या वर्षात पश्चिम रेल्वे देणार 'हे' मोठं सरप्राईज
Western Railway Update : नवीन वर्षातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबईहून दिल्ली, गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय घेतला. हे अतिरिक्त डबे ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध असतील

मुंबईहून गावाकडे जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!
Western Railway Update : नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईहून बाहेरगावी, विशेषतः दिल्ली आणि गुजरातकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अतिरिक्त वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायी ठरणार आहे.
कोणत्या गाड्यांना मिळाला फायदा?
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, खालील प्रीमियम गाड्यांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त एसी डबा जोडण्यात आला आहे.
मुंबई सेंट्रल–नवी दिल्ली तेजस राजधानी एक्स्प्रेस (12951/52)
या गाडीत आता एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित (3AC) डबा जोडण्यात आला असून, ही ट्रेन आता 22 डब्यांसह धावणार आहे.
साबरमती–नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्स्प्रेस (12957/58)
या गाडीतही एक अतिरिक्त वातानुकूलित डबा समाविष्ट करण्यात आला असून, आता ही गाडी 23 डब्यांसह चालणार आहे.
मुंबई सेंट्रल–अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस (12009/10)
प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता या गाडीत एक अतिरिक्त एसी चेअर कार डबा जोडण्यात आला असून, ती आता 22 डब्यांसह धावेल.
31 जानेवारीपर्यंत अतिरिक्त डबे
हे अतिरिक्त डबे 31 जानेवारीपर्यंत सेवेत राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या बदलामुळे गाड्यांच्या थांब्यांमध्ये किंवा वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अहमदाबाद कॉरिडोरवरील प्रवाशांना मोठा दिलासा
विशेषतः मुंबई–अहमदाबाद कॉरिडोर हा नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला मार्ग आहे. त्यामुळे या अतिरिक्त डब्यांमुळे वेटिंग यादी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. याआधीही मागील महिन्यात इंडिगो विमान सेवांमध्ये अडथळे आल्याने या मार्गावर अतिरिक्त डबे चालवण्यात आले होते.
कोणाला होणार फायदा?
मुंबई, गुजरात, बडोदा, अहमदाबाद तसेच दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नव्या वर्षात गावी किंवा कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरतो आहे.

